Kelvan In Mumbai Local Train: लोकल ट्रेनला मुंबई शहराच काळीज म्हणून ओळखलं जातं. कोणताही ऋतू असो वा कोणताही सण लोकल ट्रेन कधीही बंद नसते आणि लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला याची सवय झालेली असते. याच सवयीतून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतो.मुंबईकर आपल्या जीवनातील जास्त वेळ लोकल ट्रेनमध्ये प्रवास करुन जातो.या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क मुंबईकर महिलांनी लोकलमध्ये केळवणाचा कार्यक्रम पार पाडला आहे.जो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.
सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील(Mumbai Local) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.व्हायरल व्हिडिओतमध्ये तुम्हाला लोकलमधील जागेच्या कारणांवरून महिलांची हाणामारी पाहण्यास मिळते तर कधी काही महिला रील्स व्हिडिओ लोकलमध्ये बनवताना दिसतात.गेल्या काही दिवसापूर्वी महिलांनी लोकल ट्रेनमध्ये हळदी-कुकंवाचा कार्यक्रम केला होता,मात्र सध्याचा व्हायरल होत असलेल्या लोकल ट्रेनमधील केळवणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत, महिलांचा डब्बा दिसत आहे.जो पूर्णपणे महिलांनी सजवलेला आहे.ज्यात त्यांनी गायत्रीचे केळवण नाव लिहिलेली पाटी लावलेली आहे आणि नवरीबाईचा फोटोही लावलेला आहे.त्यानंतर तुम्हाला दिसेल की,काही महिलांनी आरतीच ताट करुन नवरीला ओवाळून तिला गिफ्ट देतात मग काय महिलांनी तिकडेच जेवणाचा कार्यक्रमही केला मग सर्वजणी डान्स करत संपूर्ण केळवण थाटामाटात साजरे करतात.
सध्या हा व्हिडिओ(Video) '5.33_csmt_khopoli' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स केलेले आहे तर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्यातील एका यूजरने प्रतिक्रिया केली आहे,''खरच खूप छान वाटले खऱ्या मैत्रीमधे पण नाही तेवढी हौस तुम्ही केली ते पण ट्रेनमध्ये'',तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''खूप छान इतकं छान डेकोरेशन केलंय की स्टार्टिंगला ती ट्रेन वाटलीच नाही कॅप्शन वाचल्यावर कळलं की ट्रेन आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : लोकल ट्रेनमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.