Viral video claiming ₹2500 monthly scheme for students turns out to be fake after investigation. saam tv
व्हायरल न्यूज

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Viral Student 2500 Scheme Fact Check: विद्यार्थ्यांना दरमहा 1500 ते 2500 रुपये मिळणार असल्याचा व्हायरल दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. सरकारकडून अशी कोणतीही योजना नसल्याचं पडताळणीत उघड. फसवणुकीपासून सावध राहा.

Sandeep Chavan

...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...विद्यार्थ्यांना 1500 रुपये आणि विद्यार्थिनींना 2500 रुपये दरमहा मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...या व्हिडिओत हे पैसे मिळवण्यासाठी काही अटही दिलीय...विद्यार्थी हा 12 वी पास हवा...घरात कुणीही सरकारी नोकरदार नसावा...आणि कुटुंबाचं उत्त्पन्न 3 लाखांपेक्षा कमी हवं...अशा 3 अटी असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

विद्यार्थ्यांसाठी दरमहा 2500 ची कोणतीही योजना नाही

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा

व्हायरल व्हिडिओ व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवण्यात आलाय

कोणतीही लिंक आल्यास अर्ज भरू नका

लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...आणि काही जण पैसे मिळतील यासाठी अर्ज भरतात...मात्र, लिंकच्या माध्यमातून आपली माहिती मिळवली जाते...आणि हॅकर्स या माहितीच्या आधारे गंडा घालतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT