petrol  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Petrol Bill Photo : चॉकलेटपेक्षाही स्वस्त दरात मिळायचं पेट्रोल; 60 वर्षांपूर्वीचं बिल पाहून चकीत व्हाल

Viral Petrol Bill Photo News : ६० वर्षांपूर्वी चॉकलेटपेक्षाही स्वस्त दरात मिळायचं पेट्रोल मिळायचं. तेव्हाच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

भारतामध्ये प्रत्येक वस्तूच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी अगदी स्वस्त दरात वस्तू मिळायच्या, मात्र आता त्याच वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ६० वर्षांपूर्वी वस्तू अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होत असत. अशाच वस्तूंच्या जुन्या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर १९६३ सालच्या पेट्रोल पंपाच्या बिलाचा एक फोटो जबरदस्त व्हायरल झाला. या फोटोवरून ६० वर्षांपूर्वी पेट्रोल किती स्वस्त होते, याची कल्पना येते. त्यावेळी ५ लिटर पेट्रोल फक्त ३ रुपये ६० पैशांना मिळत होते. म्हणजेच, १ लिटर पेट्रोल ७२ पैशांपेक्षा कमी दरात मिळायचं.

व्हायरल होत असलेला हा फोटो @ZahidSHussain1 या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या. महागाई आणि पूर्वीच्या दरांबाबत मोठी चर्चा सुरु झाली. एका युजरने विचारले की, 'त्या काळात पेट्रोलवर धावणाऱ्या गाड्याच किती होत्या?' तर दुसऱ्याने म्हटलं, 'आता तर दररोज पेट्रोलच्या दरात ७२ पैशांनी वाढ होत आहे'.

एकाने तर पेट्रोल आणि सोन्याची तुलना करत म्हटलं, 'त्या काळी जर ५०० ग्रॅम सोने खरेदी केलं असतं, तर त्या रकमेच्या तुलनेत किती लिटर पेट्रोल मिळालं असतं?' पुढे तो म्हणतो, '१९६३ साली ५ लिटर पेट्रोल फक्त ३.६० रुपयांना मिळायचं. तर आज तेच ५ लिटर पेट्रोल सुमारे ५०० रुपयांना मिळतं. तसेच १९६३ साली १० ग्रॅम सोनं ६३.२५ रुपयांना मिळत होतं. आज सोन्याचा दर लाखाच्या आसपास पोहोचला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT