IND vs PAK : टीम इंडिया पाकिस्तानला भिडणार; कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Women's World Cup 2025 : टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धा ३० सप्टेंबर रोजीपासून सुरु होणार आहे.
Ind vs pak
Women's World Cup 2025 Saam tv
Published On

Women's World Cup 2025 : महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेचं आयोजन बीसीसीआय करणार आहे. ही स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रिपोर्टनुसार, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना रंगणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महिला वनडे विश्व कप २०२५ या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही संघाचे सामना कोलंबो येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान संघाची स्पर्धेतील घोडदौड कायम राहिल्यास कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Ind vs pak
Israel Attacks Iran : इस्रायलचा पुन्हा एकदा इराणवर हल्ला; राजधानी तेहरानमध्ये नागरिकांची पळापळ, धडकी भरवणारा व्हिडिओ

महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार आहेत. त्यातील काही सामने भारतातील बेंगळुरु, इंदूर, गुवाहाटी, विशाखापट्टनममध्ये होणार आहे. तसेच कोलंबोमध्येही सामने होणार आहे. स्पर्धेतील पहिली सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबोमध्ये होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचली तरच सामना कोलंबोमध्ये खेळवण्यात येईल. दुसरा सेमीफायनलचा सामना ३० ऑक्टोबरमध्ये बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू किंवा कोलंबोमध्ये होऊ शकतो.

Ind vs pak
Home Remedies : घराच्या किचनमध्ये खूप झुरळं झाली? फक्त 'हा' पदार्थ किचनमध्ये ठेवा

भारतातील २०१३ सालानंतर पहिल्यांदा महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत ८ संघ खेळणार आहेत. ही स्पर्धा राऊंड-रॉबिन फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत पॉइंटटेबलमधील टॉप-४ टीम सेमीफायनलमध्ये पोहोचतील. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि यजमान भारताने थेट पात्रता मिळवली आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत प्रवेश मिळवणारे संघ आहेत.

Ind vs pak
Shocking : धक्कादायक! देवदर्शनाआधीच विपरित घडलं; गोदावरी नदीत ५ भाविकांचा बुडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com