महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात पावसाने दरमाद हजेरी लावलेली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अशा भिषण परिस्थितीमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हायरल व्हिडिओ पाहून अक्षरशा अंगाचा थरकाप उडतो.
पावसाळा सुरुवात होणात अनेकदा लागोपाठ मुसळधार पाऊस(Rain) पडतो. मग या सतत पडणाऱ्या पावसाने संपूर्ण नद्या ,तलाव तसेच अनेक धरणे मोठ्या प्रमाणात भरली आहेत. शिवाय सततच्या पडणाऱ्या पावसाने चाकरमानी तसेच दर दिवशी कामानिमित्ताने पडणारे व्यक्ती प्रचंड हैराण झाले आहेत. परंतू याच पावसाळामुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांनी चक्क गावाच्या मुख्य चौकातच एक बॅनर लावलेले आहे. सध्या हा बॅनरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे.
चला तर पाहूयात नक्की असे काय आहे बॅनरमध्ये, व्हायरल(Viral) होत असलेल्या या बॅनरमध्ये एका गावाच्या चौकात एक बॅनर लावलेले आहे. मात्र तुम्ही बॅनर नीट वाचले तर त्यावर लिहिले आहे की,'एक व्यक्ती चक्क पडणाऱ्या पावसाळा हार घालताना दिसत आहे शिवाय या बॅनरमध्ये एक वाक्य लिहिले आहे की,' धन्यवाद!भाऊ आता बास करा, जमिनीत पाणी जिरलं पाणी का ते माहित नाही पण आमची मात्र जिरली'!!. एक गावकरी''. ही पोस्ट वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
सध्या या बॅनरचा व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @dj kartil09 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाखोंच्या घरात लाईक्स तसेच मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी कमेंटस केल्या आहेत. त्यातील पहिला नेटकरी म्हणतो,' अरे पाऊस नाही पडला की रडतात आणि जास्त पडला त्याची माफी मागतात'. तर अजून एकाने लिहिले आहे की,' भावा आमच्याकडे अजून पाणी नाही,'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.