Viral News X Twitter
व्हायरल न्यूज

Viral News: तळीरामाचा कारनामा; गळ्यात अजगर घेत घेतला सेल्फी,नंतर... Watch Video

Viral News: एका मद्यपीने गळ्यात अजगर घेऊन फोटो काढण्याचा अट्टहास धरला. त्याचा हा अट्टहास त्याच्या जीवावर बेतला.

Bharat Jadhav

Drunk Man Viral News:

आपण किती डेरिंगबाज आहोत हे दाखवण्यासाठी अनेकजण विविध गोष्टी करतात. यात काहीजण जीवघेणा प्रकार करत असतात. असाच प्रकार केरळमधील कन्नुर येथे घडलाय. येथील एका पेट्रोप पंपवर एका मद्यपीने अजगरलासोबत घेऊन फोटो काढण्याची विनंती पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याकडे केली.

पंपवरील कर्मचारी त्याची विनंती ऐकून चक्रावले. कारण या बहाद्दरानं चक्क अजगर आपल्या गळ्याभोवती गुंडाळला होता. दारूच्या नशेत असल्यानं तो काय करतो हे त्याला कळत नव्हतं. परंतु ज्या फोटो काढण्यास सांगत होता, त्या सर्वांच्या पायाखालील जमीन सरकरली होती. परंतु दारू प्यायल्यानंतर अख्ख जग हे आपल्या पायाखाली आलं, असं दारू पिणाऱ्या व्यक्तीला वाटतं असतं. त्यात अजगर काय करेल. असाच विचार या मद्यपीच्या मनात आला असावा.  

पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या अभिषेकनं सांगितलं की, वलापट्टणम पेट्रोल पंपवर चंद्रन आला, तो दारू प्यायला होता. त्याने त्याच्या सोबत एक अजगर आणला होता. त्याला अजगरसोबत फोटो काढायचा होता. विशेष म्हणजे त्याला गळ्याभोवती अजगर ठेवून फोटो घ्यायचा होता. परंतु तो दारूच्या नशेत होता. त्याला तो काय करतो हे कळत नव्हतं. चंद्रन इतकी दारू प्यायला होता की, त्याला नीट उभं राहता येत नव्हतं.

अशा स्थितीत त्याने त्याच्या गळ्याभोवती अजगराला ठेवलं. आणि फोटोसाठी आग्रह करू लागला. मग अजगराने त्याच्या मानेला पीळ घालण्यास सुरुवात केली. अजगराने इतकी घट्ट पीळ घातली की, चंद्रनला श्वास घेता येत नव्हता. त्यात तो जमिनीवर कोसळला. हे पाहून अभिषेक त्याच्या मदतीला धावला. त्याने चंद्रनच्या मानेला पिळा घालून बसलेला अजगर दूर केला. त्यानंतर चंद्रन श्वास घेऊ लागला.

याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला की, अजगरने त्याच्या मानेला घट्ट पीळ घातला होता. चंद्रनला श्वास घेता येत नव्हता. ते पाहून मी एक गोणी घेऊन त्याच्या मदतीला धावलो. अजगरची शेपूट पकडून मी त्याला ओढू लागलो. बराच प्रयत्न केल्यानंतर चंद्रनच्या मानेवरील अजगरला दूर करू शकलो. चंद्नन खूप घाबरला होता. दरम्यान तळीराम चंद्रनच्या पराक्रमाने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर नवरदेव नववधू मतदानासाठी

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

Maharashtra Live News Update: प्रेम कुमार यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड

Ranveer Singh: मी माफी मागतो...; 'कांतारा' च्या देवाला 'महिला भूत' म्हणल्याने रणवीर सिंह अडचणीत, स्पष्टीकरण देत म्हणाला...

मतमोजणीची अशी चूक पुन्हा नकोच, निवडणुकीसाठी गाईडलाईन्स करा, कोर्टाने आयोगाला सुनावले

SCROLL FOR NEXT