truth behind viral message on pensioners DA Saam Tv
व्हायरल न्यूज

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद? नवीन कायद्यामुळे नियमांमध्ये बदल?

Fact Check: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आता महागाई भत्ता बंद होणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच कायद्यात तसा बदल झालाय का...? यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फायदे बंद करण्यात आलेयत का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता नवीन कायद्यानुसार महागाई भत्ता मिळणार नाही असा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन कायदा बनवण्यात आलाय का...? कारण, देशभरात लाखो सेवानिवृत्त कर्मचारी आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेऊन ती सांगणं गरजेचं आहे...जर नियमांत बदल केलाय तर का केलाय...? याची माहिती सांगण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...

केंद्र सरकारने अर्थसंकल्प कायदा 2025 अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ आणि वेतन आयोगातील सुधारणांसारखे सेवानिवृत्तीनंतरचे फायदे मागे घेतलेत.हा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून माहिती मिळवली...तसंच सरकारने नवीन कायदा बनवलाय का...? याचीही माहिती मिळवली...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद केलेला नाही

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ सुरूच आहेत

CCS पेन्शन 2021 च्या नियम 37 मध्ये सुधारणा

गैरवर्तनामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांचे निवृत्ती लाभ बंद होतात

CCS पेन्शन नियम, 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आलीय...सरकारी विभाग सार्वजनिक उपक्रमात रूपांतरित झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि निवृत्ती वेतनाशी संबंधित तरतुदींशी संबंधित आहे...ज्या कर्मचाऱ्यांना गैरवर्तनामुळे सेवेतून काढले जाते, तेव्हा त्यांच्या सरकारी सेवेतील लाभांवर परिणाम होतो...मे 2025 मध्ये यात सुधारणा करण्यात आलीय...मात्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला- अमित देशमुख

Ajit Pawar passed away: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, Raj Thackeray यांनी ट्विट करत अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death: विमान फिरलं अन् खाली पडलं, जागेवरच स्फोट झाला; महिलेने सांगितला अपघाताचा थरार, पाहा VIDEO

Ajit Pawar Plane Pilot: मुंबई ते बारामती...तो प्रवास ठरला शेवटचा! अजित पवारांच्या विमानाचे पायलट कोण होते?

Airplane Facts: विमान क्रॅश झालं, अचानक इंजिन बंद पडलं तर...त्याक्षणी काय करावं, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT