A self-riding AI-powered bicycle created by engineering students goes viral, sparking ghost rumors online. saam tv
व्हायरल न्यूज

AI ची भुतिया सायकल? चालकाशिवाय रस्त्यावर सायकल धावते?

viral Ghost Bicycle Video Truth In India: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘भुतिया सायकल’ व्हिडिओमागचं खरं सत्य समोर आलं आहे. सूरतमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही एआय-आधारित सायकल असून ती मोटर आणि तंत्रज्ञानाद्वारे चालते. जाणून घ्या संपूर्ण पडताळणी.

Sandeep Chavan

...हा व्हिडिओ पाहिलात...सायकल बघा, कशी रस्त्यावर धावतेय...भुतिया सायकल असल्याचा दावा करण्यात आलाय...चालकाशिवाय ही सायकल रस्त्यावर धावतेय...अशी कशी काय ही सायकल रस्त्यावर धावतेय असे प्रश्न विचारले जातायत...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...

या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी व्हिडिओ नीट पाहिला...हा व्हिडिओ नक्की कुठला आहे त्याची माहिती मिळवली...आणि खरंच रस्त्यावर भुतिया सायकल कुठून आली...? ही सायकल कशी काय चालते...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

सूरतमधील बी.टेकच्या विद्यार्थ्यांनी एआय-आधारित 'अदृश्य सायकल' तयार केली

चालकाशिवाय सायकल रस्त्यावर धावते

3 महिन्यांत पूर्ण झालेल्या प्रकल्पासाठी अंदाजे 35 हजार रुपये खर्च आला

सायकल अॅप, रिमोट आणि ऑटोमॅटिक मोडद्वारे नियंत्रित केली जाते

सायकलचे पेडल्स आणि मागचे चाक अशा प्रकारे जोडलेले आहेत की, जेव्हा मोटर पुढचे चाक फिरवते, तेव्हा मागचे चाकही फिरते आणि पेडल्स आपोआप फिरू लागतात. यामुळे असा भास निर्माण होतो की, एखादी अदृश्य व्यक्ती सायकल चालवत आहे. यामुळेच, पहिल्यांदा पाहिल्यावर लोकांना वाटते की सायकल स्वतःहून पॅडल मारत आहे, पण प्रत्यक्षात ती पूर्णपणे मोटर्स आणि तंत्रज्ञानाद्वारे चालते. या सायकलमध्ये बॅटरी, कंट्रोलर, रास्पबेरी पाय आणि संपूर्ण प्रणाली नियंत्रित करणारी इतर लहान उपकरणे बसवलेली आहेत...ती एका जुन्या सायकलचा वापर करून तयार करण्यात आलीय...ही सायकल मोटर आणि लिनियर एक्चुएटरद्वारे चालते...त्यामुळे आमच्या पडताळणीत भुतिया सायकल असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

शिंदे घराण्याची 500 वर्ष जुनी 3000 किलोची तोफ चोरीला; दरोडेखोर घेऊन आले होते ट्रक अन् क्रेन

SCROLL FOR NEXT