Viral floating shoes video shown walking on water was AI-generated, not real. Saam Tv
व्हायरल न्यूज

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Fact Check: माणूस आता पाण्यावरही चालू शकणार आहे...होय, पाण्यावरून चालण्यासाठी शूज तयार करण्यात आल्याचा दावा व्हिडिओतून केलाय...पण, खरंच पाण्यावरून चालणं शक्य आहे का...? असे शूज मार्केटमध्ये आलेयत का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल...कारण, हे शूज घातल्यावर पाण्यावर माणूस चालू शकतो...होय, असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय...बघा, ही महिला कशी शूज घातल्यानंतर सहज पाण्यावर चालतेय...हे शूज घातल्यानंतर माणूस पाण्यावर चालू शकेल...होय, या व्हिडिओत जसं दाखवलंय तसंच तुम्हीही हे शूज घालून पाण्यावर चालू शकता...बघा, ही महिला हे शूज घालते आणि पाण्यावर चालतेय...पाण्यात ती उड्याही मारतेय तरी ती पाण्यात बुडत नाही...या शूजमुळे पाण्यावर माणसाला चालणं शक्य होणार असल्याचा दावा केलाय...स्पेनमध्ये हे शूज तयार करण्यात आल्याचा दावा केलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...खरंच पाण्यावर चालण्यासाठी शूज स्पेनमध्ये तयार करण्यात आलेयत का...? हे शूज घालून खरंच पाण्यावर सहज चालणं शक्य आहे का...?

शूज बनवण्यात आलेयत तर त्याची किंमत काय...? कारण, हे शूज उपलब्ध असतील तर नदीत, पुरात, समुद्रातही फिरता येऊ शकतं...याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी आम्ही मॅकझिन पाहिले, इंटरनॅशनल पेपर्समध्ये बातमी आहे का...?

पाण्यावर चालण्यासाठी शूज मार्केटमध्ये आलेले नाहीत

स्पेनमध्ये जीनियस फ्लोटिंग शूज इनोव्हेशन झालं नाही

व्हायरल व्हिडिओतील शूज AI निर्मित

संकल्पना चांगली असली तरी प्रत्यक्षात शूज तयार नाहीत

AIच्या माध्यमातून वॉटर शूजचा व्हिडिओ बनवला

एआयमुळे काहीही बनवता येतं...त्यामुळे काहीजण असे व्हिडिओ तयार करतात आणि लोकांची दिशाभूल करतात...त्यामुळे आमच्या पडताळणी पाण्यावर चालण्यासाठी शूज आल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT