The viral image claiming to show Eknath Shinde meeting Sonia Gandhi is AI-generated and not real. Saam Tv
व्हायरल न्यूज

Eknath Shinde Meets Sonia Gandh: शिंदेंनी घेतली सोनिया गांधींची भेट? एकनाथ शिंदेंची काँग्रेससोबत आघाडी?

Fact Check: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचा दावा करण्यात आलाय...आणि आता शिंदे काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतली का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

हा फोटो आता व्हायरल करून शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचा दावा करण्यात आलाय...महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा भूकंप होणार असा दावा करून शिंदे काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतलीय का...? हा फोटो कधीचा आहे...? शिंदेंनी एवढ्या मोठ्या काँग्रेसच्या नेत्याची भेट घेतली मग साधी बातमीही का झाली नाही...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...

शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिकृतपणे काँग्रेसशी हातमिळवणी केली. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये आघाडीची चाचणी घेतली जातेय. त्याचदरम्यान शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतली.

हा मेसेज आणि फोटोही व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही याची माहिती मिळवण्यासाठी पडताळणी सुरू केली...मात्र, शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही...मग हा फोटो कधीचा आहे याची आम्ही नीट तपासणी केली...कारण, या फोटोत शिंदेंनी शर्ट फोल्ड केल्याचं दिसतंय...तर फोटोच्या साईजप्रमाणे हातही बारीक दिसतोय...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

एकनाथ शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतलेली नाही

व्हायरल होत असलेला फोटो एआय निर्मित

स्थानिक पातळीवर फक्त उमरग्यात काँग्रेससोबत युती

शिंदेंच्या हातावरूनच फोटो बनवण्यात आल्याचं कळतं

जरी भाजप आणि शिंदेसेनेत खटके उडत असले तरी शिंदे हे महायुतीसोबतच आहेत...उपमुख्यमंत्रीपदासह मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे...शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतलेली नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत शिंदेंनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT