व्हायरल न्यूज

Fact Check : झटपट नोकरी सोडाल तर लाखोंचा दंड? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

viral fact check about job switch : तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पाहा...कारण, नोकरी सोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल...तसा एक मेसेज व्हायरल करण्यात आलाय...मात्र, हे खरं आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Vishal Gangurde

तुम्ही वारंवार नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणाराय...लाखोंचा दंड कंपनी तुमच्याकडून वसूल करू शकते असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खऱंच असा नवीन निर्णय लागू करण्यात आलाय का...? कंपनी किती दंड वसूल करते...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्याआधी या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'वारंवार नोकरी बदलणे तुम्हाला महागात पडू शकतं.कारण, काही कंपन्या कर्मचाऱ्यांवर मोठा खर्च करतात, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात. त्यामुळे कुणी नियम तोडून नोकरी सोडल्यास कंपनी दंड ठोठावणार'.

हा निर्णय लागू झाला असेल तर कर्मचाऱ्यांना तातडीने नोकरी सोडणं कठीण आहे...आणि नोकरी सोडायची असल्यास कंपनीला दंड भरावा लागणाराय...म्हणजे नवी नोकरी सोडण्याआधी जुन्या कंपनीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत...आणि जर नोकरी नियम डावलून सोडली तर दंड़ लागणार...यामुळे वारंवार नोकरी बदलणारे कर्मचारी टेन्शनमध्ये आलेयत...त्यामुळे आमच्या टीमने हा नक्की काय प्रकार आहे...? सगळ्यांसाठीच हा निर्णय लागू आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत एक्सपर्टना आमची टीम भेटली...आणि त्यांच्याकडूनच सगळी माहिती जाणून घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

कर्नाटकमधील विजया बँक प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल

निकालामुळं वारंवार नोकऱ्या बदलणाऱ्यांना आळा बसेल

कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावरील खर्च वसूल करण्याचा अधिकार कंपनीला

नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं

विजया बँकेच्या एका कर्मचाऱ्याने 3 वर्षे अनिवार्य असतानाही सेवा पूर्ण न करता नोकरी सोडली...त्यामुळे बँकेने 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला...याविरोधात कर्मचाऱ्याने कोर्टात धाव घेतली...मात्र, बँकेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली असता कोर्टाने कर्मचाऱ्याला दणका दिला...हा निकाल सर्वच कोर्टांना लागू शकतो...त्यामुळे तुम्ही नियम तोडून नोकरी सोडत असाल तर दंड लागू शकतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT