Heart Attack Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मिठाईच्या दुकानात काम करताना जमिनीवर कोसळला,२५ वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; थरारक VIDEO

Heart Attack Video: उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मिठाईचा दुकानात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heart Attack in sweet shop

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशातच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मिठाईचा दुकानात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर प्रदेशातील आग्राच्या कमला नगरमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा कामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जसवीर उर्फ ​​वीरू असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता.२) रोजी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसते की, काही व्यक्ती आपल्याला एका ठिकाणी उभे असलेले दिसत आहेत तर काही व्यक्ती जमिनीवर बॉक्स पॅकींगचे काम करताना दिसत आहेत.जसवीर ही जमिनीवर बसून काम करत आहे अशातच काही वेळानंतर जसवीर अचानक बसलेल्या ठिकाणावरुन जमिनीवर बेशुद्ध पडतो. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी जसवीर मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया एक्सवरील (ट्वीटर) @priyarajputlive या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही घटना मन हेलावून टाकणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याआधी ही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा हार्ट अटॅकचा धोका जाणवत असून चालता- बोलता, जेवण करता करता मृत्यूने गाठल्याच्या घटना घडत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT