Viral Accident Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: भयंकर व्हिडिओ! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांच्या अंगावरून गेली भरधाव कार; पुढे जे घडलं ते...

Driver Runs Over Women Sleeping on The Ground Video: दोघेही गाढ झोपेत असताना एक भरधाव येते आणि महिलेच्या मानेवरुन जाते.

Gangappa Pujari

Viral Accident Video: सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो हेच या व्हिडिओमधून दिसत असते.

सध्या अशाच एका भयंकर अपघाताच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन गाडी गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.

देशभरात सध्या अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. कधी चालकांच्या निष्काळजीपणामुळे तर कधी वाहतूकीचे नियम न पाळल्याने हे अपघात होत असतात. वाहन चालकांच्या छोट्याशा चुका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठरतात. सध्या अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये चक्क झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन कार घातल्याचे दिसत आहे. त्या व्यक्ती सुखरुप आहे, मात्र तिला गंभीर दुखापत झाली असून ती वेदनेने विव्हळताना दिसत आहे. या भीषण अपघातात शेजारील महिला थोडक्यात बचावली असून मोठा अनर्थ टळला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक महिला आणि पुरूष एका दुकानासमोर चादर टाकून झोपल्याचे दिसत आहे. दोघेही गाढ झोपेत असताना एक भरधाव येते आणि महिलेच्या मानेवरुन जाते. धक्कादायक बाब म्हणजे गाडीच्या चाकाच्या अगदी काहीच अंतर दूर असल्याने दुसरी व्यक्ती बचावते.

गाडीचे चाक मानेवरुन गेल्यानंतर कार चालक तात्काळ गाडी थांबवून महिलेला पाहायला खाली उतरतो. यावेळी मानेवरून कार केल्याने महिला घाबरून उठते आणि आरडाओरडा करु लागते. तिला वेदनेने ओरडताना पाहून शेजारी झोपलेला व्यक्तीही झोपेतून जागा होतो. कार चालकाने गाडी तात्काळ थांबवल्याने महिलेचा जीव वाचला.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या कारचालकाने निष्काळजीपणा केल्यानेच हा अपघात झाल्याचे म्हणले आहे. तर अनेकांनी रस्त्यावर झोपलेल्या या दोघांनाही दोष दिला असून असे रस्त्यावर झोपणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत १५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहत. तर ८० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. (Viral Video News In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT