fish on Mumbai Local Railway Tracks Saam Tv
व्हायरल न्यूज

Fish Viral Video: मुंबई लोकलच्या ट्रॅकचा झाला फिश टॅंक, रुळावर साचलेल्या पाण्यात पोहोतायत मासे; पाहा व्हिडिओ

fish on Mumbai Local Railway Tracks: मुंबईला पावसानं झोडपून काढल्यानंतर सोशल मीडियात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. मुंबईत चक्क रेल्वे ट्रॅकमध्ये मासे आल्याचं दिसतंय.

साम टिव्ही ब्युरो

पावसामुळे मुंबईचं दरवर्षी वॉटर पार्क होतं, असं उपहासात्मक पद्धतीने म्हटलं जातं. मात्र आता चक्क फिश टॅंक झाला आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मुंबई लोकल ट्रॅकवर साचलेल्या पाण्यात मासे पाहायला मिळाले आहेत. मुंबई रविवार आणि सोमवारी मुसळधार पाऊस झाला.

अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याच साचलेल्या पाण्यात मासे पोहोतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटीझन्सनं रेल्वेची चांगलीच खिल्ली उडवलीय.

पहिल्याच पावसात रेल्वेची दाणादाण उडाली. रेल्वे ट्रॅकवर ट्रेन धावत नसल्यानं माशांनी ट्रॅकचा स्विमिंग पूलपणे आनंद घेतला, अशा प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकलं नाही.

कोकण रेल्वेला पावसाचा फटका

दरम्यान, गोव्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलाय. गोवा -पेरनेम येथे बोगद्यातून रूळावर मोठ्याप्रमाणात पाणी व माती आल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. गेले दोन ते तीन तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

त्यामुळे मुंबई व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT