Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पुण्याच्या रिक्षाचलकाचा अनोखा जुगाड! थेट रिक्षामध्ये बसवला फिश टँक; VIDEO VIRAL

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे अर्थाच विदेचे माहेरघर. पुणे शहरात आपल्याला अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात. सोशल मीडियावरही पुणे आणि पुणे शहराच्या अनेक भागातील विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी पुणे शहरातील घराच्या बाहेर असलेल्या अनोख्या पाट्यांचे व्हिडिओ असतात कधी पुण्यातील सण-उत्सावांचे. अशातच सोशल मीडियावर पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

आपल्यापैंकी प्रत्येक व्यक्ती (person) दररोज एकदा तरी रिक्षाचा प्रवास करत असतो. रिक्षाचा प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात राहतात,म्हणजे की रिक्षा चालकासोबत झालेले वाद. तर काही रिक्षा अशा असतात की,चक्क रिक्षामध्ये फॅन (Fan) बसवलेले असतात ते ही प्रवाशांसाठी. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका रिक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क संपूर्ण रिक्षामध्ये रिक्षाचलकाने ''फिश टॅंक'' बसवलेले आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला असून ''@nilesh_bhau_1312'' या अकाउंटवर जाऊन तुम्ही व्हायरल व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ साधारण सहा दिवसापूर्वी इन्स्टाग्रावर शेअर करण्यात आलेला असून आता पर्यंत व्हिडिओला ९१ हजार ४४५ नेटकऱ्यांनी पंसत केलेला आहे तर व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळत असून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर (Shares) करण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया

दरदिवशी पुणे (Pune) शहरातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस आलेल्या आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''वा रे काय आयडिया आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कडक बनवली आहे रिक्षा'' (rickshaw) तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'' हे फक्त पुण्यात पाहता येऊ शकते'', अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT