Bihar Crime News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मोठा राडा झाला! नवरा बाहेरगावी, बायको बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत; त्याचवेळी गावकरी धडकले? नेमकं काय घडलं?

Bihar Crime News : पूर्णिया जिल्ह्यात जमावाकडून महिला आणि तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कायदा हातात घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • पूर्णियात जमावाकडून मारहाण

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • पोलिसांकडून तपास सुरू

  • कायदा हातात घेतल्याने संताप

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक नागरिकांनी एका विवाहित महिलेला तिच्या पतीच्या अनुपस्थितीत नको त्या अवस्थेत बॉयफ्रेंडसोबत रंगे हाथ पकडले. यानंतर गावकऱ्यांनी त्या महिलेला आणि तिच्या कथित प्रियकराला एका खांबाला बांधून बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे ही महिला गरोदर असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर महिला कुटुंबासोबत राहते. याच ठिकाणी तिचा बॉयफ्रेंड देखील राहतो. तसेच महिलेचा पती कामानिमित्त बाहेर असल्याने तिचा बॉयफ्रेंड नेहमी घरी यायचा. ते दोघे अनेकदा गुप्तपणे भेटत असत. बुधवारी रात्री, गावकऱ्यांनी त्यांना शेतात नको त्या अवस्थेत पकडले.

यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या दोघांना चावडीवर उभं करत एका खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेच्या नवऱ्याला या घटनेची माहिती कळताच त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने म्हटले की, मला माझ्या बायकोवर संशय होता. तिचे अनैतिक संबंध सुरु असल्याचे माझ्या लक्षात आले होते. मी अनेकदा तिला बजावलं देखील, मात्र तिने माझी फसवणूक केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक तरुण आणि एका महिलेला खांबाला बांधून मारहाण करताना पाहायला मिळत आहे. या मारहाणीत महिला मोठं मोठ्याने ओरडत आहे, तर सुटकेसाठी गावकऱ्यांकडे गयावया करत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, पूर्णिया प्रशासनाने याचा शोध सुरु केला आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले असून व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT