Saam Tv
व्हायरल न्यूज

एटीएममध्ये निघाला विषारी नाग; पैसे टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप

Snake In Atm: बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला विषारी नाग दिसल्याने मोठी खळबळ उडाली. तातडीने सर्पमित्राला बोलावून नागाला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Tanvi Pol

Atm Snake Incident Video: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव झंजाळ या गावातील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. जिथे एका बँकेच्या एटीएममध्ये एक मोठा विषारी साप सापडला असून या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पैसे भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला धक्का

नेहमीप्रमाणे बँकेचा कर्मचारी एटीएममध्ये कॅश लोड करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने मशीन ओपन करताच त्याच्या नजरेस एक भला मोठा, काळसर रंगाचा साप (Snake) पडला. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही की एटीएममध्ये असा साप असू शकतो, पण काही क्षणांतच साप हालचाल करू लागल्याने त्याची भीती वाढली.

तातडीने सर्पमित्राला पाचारण

सदर प्रकार लक्षात येताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही रिस्क न घेता तातडीने गावातील स्थानिक सर्पमित्राला संपर्क केला. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचला आणि संपूर्ण खबरदारी घेत एटीएम मशीन उघडण्यात आलं. आत पाहिलं असता साप खरोखरच मशीनच्या मागच्या बाजूस गुंडाळून बसलेला होता. सर्पमित्राने अत्यंत काळजीपूर्वक त्या सापाला मशीनमधून बाहेर काढलं.

थरारक क्षण आणि व्हिडीओ

हा संपूर्ण प्रकार काही ग्राहकांच्या समोरच घडला. बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांनी सर्पमित्राची ही कारवाई मोबाईलमध्ये शूट केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सापाचा संपूर्ण थरार आणि सर्पमित्राचं कसब दिसून येतं.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT