Wedding Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

नवरदेवाची दाढी पाहून नवरी भडकली, थेट लग्नाला दिला नकार; पुढे काय घडले ते पाहा

bride refuses to marry bearded groom: सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील विचित्र प्रकार समोर आलेला आहे. जिथे नवरीने नवरदेव दाढीत आलेला असल्याने लग्न मोडलं आहे. मात्र पुढे जे घडतं ते एकदा तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Sitapur wedding Video: उत्तर प्रदेशच्या सीतापुर जिल्ह्यातील एक विवाह सोहळ्यामधील भांडण चर्चेचा विशष ठरला आहे. या विवाहात नवरीने थेट मांडवातच लग्न करण्यास नकार दिला. कारण, नवरदेवाने चेहऱ्यावर दाढी ठेवली होती, तर नवरीला मात्र क्लीन शेव्ह असलेला नवरदेव अपेक्षित होता. सोशल मीडियावर या लग्नातील सर्व प्रसंग व्हायरल झालेला आहे.

दाढीमुळे मोडलं लग्न! नवरीचा थेट निर्णय चर्चेत

घडले असे की, संपूर्ण घटना सीतापूर जिल्ह्यातील आहे. जिथे अनीता या तरुणीचे लग्न विमल या तरुणाशी ठरले होते. लग्नाचे दिवसही जवळ आले होते आणि सर्व कुटुंबियांतील आनंदी होते. ज्या दिवशी लग्नाचा(Wedding Video) मुहुर्त होतो त्याप्रमाणे सर्वजण मंडपात दाखलही झाले. त्यानंतर नवरीही मंडपात आली आणि ज्या वेळी नवरदेव तिच्यासमोर आला. त्या क्षणी तिने भर मांडवात लग्नाला नकार दिला.

लग्न न करण्याचे कारण काय?

नवरीने लग्नाला नकार दिल्याने सर्वजण हैराण झाले आणि नवरीला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, नवऱ्याने क्लीन शेव करुन मांडवात येण्यास पाहिजे होते. कारण तिची इच्छा होती. त्यानंतर सासरच्यांनी तरुणीला खुप समजावले.

मांडवात पोलिसांची एन्ट्री

लग्नातील प्रकार थेट पोलिस स्टेशनपर्यंत गेल्याने घटनास्थळी पोलिस आले. दोन्ही कुटुंबियांच्यामध्ये बोलणी झाली. मग काय दुसऱ्या दिवशी नवरदेव क्लीन शेव करुन अगदी थाटामाटात पुन्हा मांडवात दाखल झाला आणि व्यवस्थित भारतीय पद्धतीने लग्न होऊन तरुणी सासरी गेली.

सर्व घटना सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल(Viral Video) होत आहे. त्यात तो व्हिडिओ एक्सवरील @WeUttarPradesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिलेली आहे. लग्नातील हा प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून संतापजनक आणि गमंतशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT