उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगरमध्ये एक विचित्र घटना घडलीय. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलंय. मुलांचा आपण संभाळ करू तू जा प्रियकरासोबत लग्न कर असं म्हणत पत्नीचं प्रियकरासोबत लग्न लावून दिलं. ही विचित्र घटना संत कबीरनगरातील कटोर जोत गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कटोर जोत गावातील कल्लू नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कल्लू याचं लग्न २०१७ साली गोरखपूर येथील भूलनचक गावातील तौली राम नावाच्या व्यक्तीच्या मुलीशी झाला होता. कल्लूच्या पत्नीचं नाव राधिका असं आहे.
कल्लू आणि राधिका यांच्यात गोडी गुलाबीचं वातावरण होतं. लग्नानंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक होतं.
पती-पत्नी दोघेही आनंदाने एकत्र राहत होते. त्यांच्या लग्नाच्या आठ वर्षात त्यांना दोन मुलेही झाली. मोठा मुलगा सात वर्षांचा आहे त्याचं नाव आर्यन आणि एक मुलगी असून तिचं नाव शिवानी आहे. कल्लू कामासाठी अनेकवेळा घराबाहेर राहत होता. कल्लू घरी राहत नसल्यानं काळात पत्नी राधिकाचं एक युवकावर प्रेम जडलं. हा मुलगा गावातीलच होता.
दोघांमध्ये बरेच दिवस संबंध होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कल्लूला मिळाली. त्यानंतर कल्लूने राधिकाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिने नवऱ्याऐवजी प्रियकराला निवडलं. त्यानंतर या दोघांचा वाद पंचायतीसमोर ठेवण्यात आला. पंचायतीमध्ये पत्नीने प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पती कल्लूने आनंदाने पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचं निर्णय घेतला.
कल्लूने पत्नीला प्रियकराशी लग्न करण्यास सांगितले. मुलांना आपण सोबत ठेवू आणि त्यांचे पालनपोषण करू असं पतीने सांगितलं. त्यानंतर पती-पत्नी नोटरी करून घेण्यासाठी कोर्टात गेले आणि नंतर मंदिरात पतीने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. दोघांनीही मंदिरात एकमेकांना वरमाला घातली. विशेष म्हणजे या लग्नाला अख्खं गाव उपस्थित होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.