Uttar Pradesh Fire News Saam TV
व्हायरल न्यूज

Uttar Pradesh Fire News: रात्री गाढ झोपेत असताना अग्नितांडव; आईसह पोटच्या ५ मुलांचा होरपळून मृत्यू

आगीत आईसह तिच्या चिमुकल्या ५ बाळांचा मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. रात्री गाढ झोपेत असताना एका घराला आग लागली. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आगीत आईसह तिच्या चिमुकल्या ५ बाळांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेनं परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या महितीनुसार, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उरधा या गावात आगीची ही घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा महिलेचा पती घराबाहेर झोपला होता. तसेच महिला आपल्या ५ मुलांसह घरात झोपली होती. अचानक त्याच्या झोपडीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून महिला आणि तिच्या मुलांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थाळी दाखल झाल्या. मात्र आगीने झपाट्याने पेट घेतल्याने कुटुंबातील एकालाही वाचवण्यात यश आलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी पाहनी केल्यावर मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

गावापासून लांब होतं घर

कुटुंबातील सर्वांनी रात्रीचे जेवण केले. त्यानंतर पती आपले अंथरुन घेऊन बाहेर झोपला. पत्नीने देखील मुलांना जवळ घेत झोपून घेतलं. रात्री अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या आणि मुलांसह पत्नी किंचाळत असल्याचं पतीच्या कानी पडलं. त्यावर तो हडबडून जागा झाला. त्याचं घर गावापासून कालव्या जवळ असल्याने तिथे बाकिच्या व्यक्तींची घरं नव्हती. तसेच रात्री सर्व झोपलेले असल्याने गावकरी पटकन मदतीसाठी येऊ शकले नाही.

काही वेळातच ३८ वर्षीय संगीता (आई), १० वर्षीय अंकित, ९ वर्षीय लक्ष्मीना, ३ वर्षीय रीटा, २ वर्षीय गीता आणि १ वर्षीय बाबू यांचा जळून मृत्यू झाला. घराला आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT