Trending Viral News: आजच्या सोशल मीडियाच्या काळात रोज काही ना काही भन्नाट आणि गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी माणसांच्या अतरंगी कृत्यांचे, तर कधी प्राण्यांच्या मजेशीर व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याने जे केलं, ते पाहून तुम्हीही हसून हसून थकून जाल.
हा प्रकार एका मिठाईच्या(Sweet Shop) दुकानात घडला. मात्र तो कोणत्या शहरातील आहे ते अद्याप समजले नाही. तर घडलं असं की, दुकानामध्ये सर्व सामान व्यवस्थित मांडलेलं होतं, आणि गोड गोड मिठाईंचा वास संपूर्ण परिसरात दरवळत होता. पण या वासाने केवळ ग्राहकांनाच नाही, तर एका भटक्या कुत्र्यालाही आकर्षित केलं. तो थेट दुकानाच्या आत शिरला आणि सरळ काउंटरवर उडी मारली.
कुत्र्याने दुकानात पाय ठेवताच त्याचं लक्ष थेट मिठाईवर गेलं. काउंटरच्या वरच्या भागावर ठेवलेली मिठाई त्याला प्रचंड भुरळ घालू लागली. काही क्षण तो आजूबाजूला पाहत राहिला. दुकानदार किंवा इतर कर्मचारी काही बोलतील की काय, याची वाट पाहत होता की काय, असंही वाटलं. पण नंतर थेट काउंटरवर चढून मिठाईवर ताव मारायला सुरुवात केली.
हा व्हायरल व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटिझन्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काही यूजर्संनी लिहिलं की, ''हा खरा गोड चोर आहे'', तर काहींनी म्हटलं,''इतकी मिठाई पाहून माणूससुद्धा थांबणार नाही'' काही युजर्सनी तर मिठाई दुकानासाठी हा विनामूल्य प्रमोशन असल्याचंही म्हटलं. अनेकांनी कुत्र्याची ही करामत अगदी मजेशीर आणि निरागस असल्याचं नमूद केलं.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.