Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा! काकांनी ट्रेनमध्ये झोपण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Viral Video In Train: इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ट्रेनच्या जनरल डब्यात जागा मिळवून काका झोपलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत, कारण ट्रेनमध्ये जागा मिळणेच अनेकांसाठी भाग्याचे ठरते.

Dhanshri Shintre

भारतीय रेल्वेतील प्रवासी मोठ्या प्रमाणावर 1AC, 2AC, 3AC, स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये प्रवास करतात. विशेषतः जनरल डब्यांमध्ये जागा मिळणे ही अनेकांसाठी नशिबाची गोष्ट मानली जाते, कारण ते नेहमीच गर्दीने खचाखच भरलेले असतात. मात्र, नुकताच इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने टॉवेलचा वापर करून जनरल डब्यात आरामात झोपण्याचा अनोखा उपाय शोधला आहे. त्याचा हा भन्नाट प्रयोग पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. गर्दीच्या परिस्थितीतही अशाप्रकारे झोप मिळवणे लोकांना आश्चर्यकारक वाटत आहे आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे. त्यांनी सीटवर बसून टॉवेल वरच्या बर्थला बांधले आणि आरामात झोप घेतली. ज्यामुळे त्यांचे डोके इकडे तिकडे पडत नाही आणि ते शांतपणे झोपले आहेत. त्यांच्या या हटके कल्पनेने इंटरनेट वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत.

सामान्यतः लोक शेजारी बसलेल्या व्यक्तीवर डोके ठेवून झोपतात, पण या काकांनी हा हटके उपाय इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला असून व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून कमेंट सेक्शनमध्ये धम्माल सुरू आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या सामान्य बोगीत प्रवासी जागेअभावी जमिनीवर बसून प्रवास करताना दिसत आहेत. मात्र, सीटवर बसलेले हे काका त्यांच्या झोपेची व्यवस्था भन्नाट पद्धतीने करताना पाहायला मिळतात.

व्हायरल व्हिडिओवर कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी यांच्या झोपण्याच्या हटके जुगाडावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, खाली बसलेल्या भावाला जागा मिळाली नाही पण तो तरीही आनंदी आहे. दुसऱ्याने म्हटले, इकडचे तिकडे म्हणजे १९-२० झाले तर काहीही होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT