Ukhana Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ukhana Viral Video: मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...देवेंद्र फडणवीसांच्या त्या डायलॉगचा वापर करुन नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा;VIDEO VIRAL

Groom Ukhana Viral Video: लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याच निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे. दरम्यान एका नवरदेवाने आपल्या उखाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या डायलॉगचा वापर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा संगीत, डान्स आणि वरातीचे व्हिडिओ असतात. लग्नात सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे नवरा- नवरीचे उखाणे ऐकण्याची. सध्याच्या काळात नवीन ट्रेंडनुसार नवरा नवरी अनेक भन्नाट उखाणे घेतात.यातील काही उखाणे सध्याच्या परिस्थितीवर आधारित असतात. म्हणजेच अनेकदा वटपोर्णिमेला त्याच आशयाचे उखाणे घेतात. परंतु एका नवरदेवाने चक्क महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आशयाने उखाणा घेतला आहे. त्याने देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग म्हणत भारी उखाणा घेतला आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत जेवणाच्या पंगतीत नवविवाहित जोडपं बसलेलं दिसत आहे. नवरा-नवरी जेवताना दिसत आहे. तेव्हा नवरा- नवरीला उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. यावेळी नवरदेव एकदम भारी उखाणा घेतो. नवरदेव उभा राहतो आणि म्हणतो की, महाराष्ट्राच्या राजकारणावरील हा उखाणा आहे. त्यानंतर तो म्हणतो की, 'देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आता मी माझ्यासोबत प्राजक्ताला कॅनडाला नेईन'. हा उखाणा ऐकताच सर्वजण जोरजोरात हसू लागतात. नवरदेवाने अतिशय वेगळा उखाणा घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे. या व्हिडिओवर हटके कॅप्शन दिले आहे की, 'जेव्हा नवरदेव कॅनडाचा असतो तरी त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी सर्व अपडेट आहेत'.

godzee_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवरदेवाने हा उखाणा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT