Local Train Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: पाहावं ते नवलच...! चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पार पडला तुळसी विवाहसोहळा, VIDEO एकदा पाहाच

Local Train Viral Video:मुंबईची लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे. अशातच तुळशी विवाह सोहळा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी साजरा केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Local Train Viral Video

मुंबईची लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. मात्र या धकाधक्कीच्या प्रवासातही मुंबईकर प्रत्येक सण मुंबई लोकलमध्ये आनंदाने साजरा करत असतो. अशात एका मुंबई लोकलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तुळशी विवाह सोहळा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी साजरा केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐकावं ते नवल...!

मुंबईकरांचा उत्साह आपल्याला प्रत्येक सणात दिसून येतो. या सणामध्ये मराठी माणसांपासून पर प्रांतीय व्यक्ती आनंदाने सहभाग घेतो. असाच उत्साह आपल्याला मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होत असलेल्या तुळशी विवाहात दिसतोय. चक्क भर गर्दीत लोकलमधील प्रवाशी तुळशीचे लग्न लावत आहेत. हा व्हिडिओ लोकलमधील पुरूषांच्या डब्यातील आहे.

यात लोकलचा डब्बा कागदांच्या तोरणांनी सजवला आहे. लग्नातील पद्धतीप्रमाणे आतंरपाठ पकडला आहे. आतंरपाठाच्या दोघी बांजूनी तुळशीचे लहान रोप आहेत. तसंच ऊसाची कांडीही दिसत आहे. तसंच एक व्यक्ती मंगलाष्टके बोलत आहे. काही प्रवासी आपल्या मोबाईलमअध्ये हे कैद करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ हा @_aamchi_mumbai_या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहील की,तुळसी विवाह Mumbai Local Edition!.लोकलमधील प्रवाशाने आपल्या मोबाईमध्ये हा क्षण कैद केलाय.

लोकल ट्रेनमधील तुळसीचे लग्नचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहे. एका यूजरने म्हटलं,'आपली संस्कृती जपत आहेत 'असा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT