...हा व्हिडिओ पाहिलात...यामध्ये दावा करण्यात आलाय की FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली झालीय...आणि आता ते थेट राजस्थानात जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली झालीय का...? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची अनेकांनाच उत्सुकता आहे...? त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...
तुकाराम मुंढे जरी नाव ऐकलं तरी मोठ मोठे व्यापारी, हॉटेल्स चालक, डेअरी दुकानदार यांचा थरकाप उडतो...कारणही तसंच आहे...मुंढेंनी भेसळ करणाऱ्यांवर आणि अस्वच्छ हॉटेल्सवर कारवायांचा धडाकाच लावलाय...अस्वच्छता आढळल्याने अनेक हॉटेल्स, डेअरी, कॅन्टीनचे परवानेच रद्द केलेयत...या कारवायांमुळे अनेकांची दुकानं बंद आहेत...पनीर, आयस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यांवरही त्यांनी कारवाई केली...त्यामुळे मुंढेंची अनेकांनी धास्ती घेतलीय...आणि आता तुकाराम मुंढे यांची बदली राजस्थान कॅडरमध्ये झाल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीय...खरंच मुंढेंची बदली राजस्थानात झालीय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...सध्या मुंढे हे चर्चेत आहे, प्रामाणिक आणि डॅशिंग अधिकारी अशी त्यांची प्रतिमा जनतेत आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने मुंढेंची भेट घेतली...आणि त्यांच्याकडूनच याबाबत माहिती जाणून घेतली...
तुकाराम मुंढेंची बदली झालेली नाही
ही बातमी पूर्णपणे खोटी दिशाभूल करणारी
मुंढे सध्या महाराष्ट्रात FDA आयुक्त म्हणूनच कार्यरत
मुंढे महाराष्ट्र कॅडरचे असल्याने बदली राज्यातच होईल
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची राजस्थानमध्ये बदली झालेली नाही...सोशल मीडियावर त्यांची 26 वी बदली राजस्थानला झाल्याचा दावा खोटा आहे...सध्या धडक कारवायांमुळे मुंढेंची देशभरातच नव्हे तर परदेशातील वृत्तपत्रांनीही दखल घेतलीय...त्यामुळे काहींनी चुकीचा दावा करून मेसेज व्हायरल केला...मात्र,आमच्या पडताळणीत तुकाराम मुंढेंची राजस्थानात बदली झाल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.