Viral image claiming a ghost sighting in Nashik was found to be AI-generated during fact-check Saam Tv
व्हायरल न्यूज

नाशिकच्या रस्त्यावर भूत? भुताचे फोटो व्हायरल झाल्याने दहशत

Fact Check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता नाशिकच्या रस्त्यांवर भूत फिरत असल्याचा दावा करणारा फोटो व्हायरल होतोय...पण, खरंच भूत फिरतंय का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

...हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही...हे भूत रात्री नाशिकच्या रस्त्यांवर फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय...गावात निर्मनुष्य भागात हे भूत दिसत असल्याचा दावा केल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय... हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत...रात्री जागून ग्रामस्थ भूत कुठे दिसतंय का...? याचा शोध घेतायत...

नाशिकच्या बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूत फिरतंय. बागलाणच्या आराई गावात भूत दिसलं. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्याने दहशत माजलीय...खरंच नाशिकच्या बागलाणमध्ये भूत दिसलं का...? हा विषय लोकांच्या सुरक्षेचा असल्याने आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली... आमचे प्रतिनिधी थेट आराई गावात पोहोचले आणि तिथल्या सरपंचांकडून अधिक माहिती जाणून घेतली...

गावात भूत दिसल्याची अफवा आहे, मग हा फोटो कुणी व्हायरल केला...पोलीसही शोध घेत असल्याने त्यांनी कारवाई केलीय का...? हेही जाणून घेतलं...

नाशिकमध्ये कुठेही भूत दिसलेलं नाही

भूत फिरत असल्याच्या फक्त अफवा

AIने बनवलेले फोटो भुताचे म्हणून व्हायरल केले

भूत असल्याचा दावा करून दिशाभूल

या फोटोपासून व्हिडिओही बनवणं शक्य आहे...या एआय फोटोच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओही बनवला...असेच फोटो, व्हिडिओ बनवून व्हायरल केले जातात...त्यामुळे आमच्या पडताळणीत नाशिकच्या रस्त्यावर भूत फिरतंय हा दावा असत्य ठरला...भूत हे अस्तित्त्वात नाही...लोकांना घाबरवण्यासाठी असे फोटो व्हिडिओ व्हायरल केले जातायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT