Viral claim suggests banks can lock smartphones for missed EMI payments, but the truth depends on specific loan conditions. saam tv
व्हायरल न्यूज

बुडवाल लोन, तर लॉक होईल फोन? कर्ज बुडवणाऱ्यांना बँकेचा दणका?

Fact Check: कर्ज बुडवलात तर तुमचा मोबाईलच लॉक होऊ शकतो...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे तुम्ही जर कर्जावर मोबाईल घेत असाल तर सावध व्हा...हा मेसेज आता व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Sandeep Chavan

कर्ज थकवलं तर बँक मोबाईल लॉक करणार.त्यामुळे कर्ज थकवणं महागात पडू शकतं.

हा मेसेज व्हायरल होतोय...बरेच जण मोबाईल वापरतात...काहीजण महागडे मोबाईल ईएमआयवर घेतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, पैसे नसले तर काही जणांना हप्ता भरायला उशीर होतो...पण, खरंच कर्ज घेऊन मोबाईल घेतला असेल आणि जर हप्ता भरला नाही तर बँक मोबाईल लॉक करू शकते का...? हा प्रश्न उपस्थित होतोय...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहितीसाठी आम्ही काही पेपर्स पाहिले...मॅकझिन्समध्ये अशी बातमी आहे का हे पडताळून पाहिलं...तसेच आम्हा याबाबत एक्सपर्टकडूनही माहिती मिळवली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

मोबाईल EMI वर घेतला असल्यास नियम लागू

वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज घेतल्यास नियम लागू होत नाही

इतर कर्जाची परतफेड न केल्यास फोन ब्लॉक होणार नाही

90 दिवसांपर्यंत हप्ता भरला नाही तर बँक कारवाई करू शकते

फोन लॉक करण्यापूर्वी ग्राहकाला सूचना देणे आवश्यक

ईएमआय भरल्यानंतर एका तासात फोन अनलॉक केला जातो...कर्ज भरल्यानंतर फोन सुरू न केल्यास बँकेकडून ग्राहकाला प्रति तासाला 250 रुपये द्यावे लागतील...यावेळी इनकमिंग फोन सुरूच राहतील...तसेच सर्व डेटा सुरक्षित राहणार आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत कर्ज बुडवल्यास फोन लॉक होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय...सध्या रिझर्व बँकेने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव तयार केलाय...तो प्रस्ताव लागू झाल्यास या अटीतून दिलासा मिळू शकतो...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT