Sakshi Sunil Jadhav
२८ ऑगस्ट २०२६ रोजी वर्षातले दुसरे आणि शेवटचे आंशिक चंद्रग्रहण होणार आहे.
भारतीय वेळेनुसार सकाळी ८.०४ वाजता ग्रहण सुरू होऊन ११.२१ वाजता समाप्त होईल. ९.४३ वाजता ग्रहणाचा मध्यकाल असेल.
ग्रहणाची वेळ भारतात दिवसाची असल्याने चंद्र क्षितीजाखाली असेल आणि हे ग्रहण भारातातून दिसणार नाही.
युरोप, ऑफ्रिका, पश्चिम आशिया, अमेरिका, प्रशांत महासागर, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका भागांत चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे.
ग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे पारंपरिक धार्मिक मान्यतेनुसार भारतात सुतककाळ लागू होणार नाही.
भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने रक्षाबंधनावर ग्रहणाचा वेध नसल्याचे मानले जाते. मात्र राखी बांधताना भद्रा आणि राहुकाळाची वेळ तपासा.
ज्योतिषीय गणनेनुसार हे वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण कुंभ राशीत लागणार आहे.
कुंभ राशीत राहूच्या स्थितीमुळे ज्योतिषशास्त्रात या ग्रहणाला विशेष महत्त्व दिले जात असून काही राशींवर परिणाम होण्याची मान्यता आहे.
ग्रहण भारतात दिसणार नसल्याने रक्षाबंधन नेहमीप्रमाणे साजरे करता येईल. धार्मिक विधींसाठी स्थानिक पंचांगातील वेळा पाहणे योग्य ठरेल.