Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Sakshi Sunil Jadhav

घरमालकांची जबाबदारी वाढली

घर भाड्याने दिल्यानंतर फक्त भाडे मिळणे पुरेसं नाही. भाडेकरूची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणं ही घरमालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.

Pune tenant verification

पुण्यात १७० गुन्हे दाखल

भाडेकरुंची माहिती पोलिसांकडे न दिल्याप्रकरणी पुणे शहरातले विविध पोलिस ठाण्यांमध्ये १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

tenant verification Pune

भाडेकरूचे ओळखपत्र

घर भाड्याने देण्याआधी भाडेकरूचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे. ओळखपत्रावरची माहिती खरी आणि अचूक असल्याची खात्री करा.

Pune police tenant registration

कायमचा पत्ता

भाडेकरूचा कायमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घरमालकांनी नोंदवून ठेवावा. करारपत्रामध्येही ही माहिती अचूकपणे नमूद करणं महत्त्वाचं आहे.

tenant police verification

पोलिसांकडे नोंद करा

भाडेकरूची आवश्यक माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवणं आवश्यक आहे. यामुळे भविष्यात कोणतीही संशयास्पद घटना घडल्याने पोलिसांना तपासात मदत होते.

tenant police verification

भाडेकराराची माहिती महत्त्वाची

घर भाड्याने देताना योग्य पद्धतीने भाडेकरार करणे आवश्यक आहे. करारातील नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि इतर माहिती अचूक असल्याची खात्री करा.

Pune rental house rules

सुविधा कुठे मिळेल?

भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे घरमालकांना प्रत्येक वेळी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही.

tenant verification rules

नियम तोडल्यास कायदेशीर कारवाई

भाडेकरार न करणे किंवा भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणे याबाबत संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.

tenant verification rules

NEXT : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Raksha Bandhan Date | meta ai
येथे क्लिक करा