Theft on Agra-Mumbai National Highway Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: सिनेमातील स्टंट नव्हे खरीखुरी धुमस्टाईल चोरी! बाईकवरुन आले अन् हायवेवर धावत्या ट्रकमधील माल लुटला; थरारक VIDEO

Theft on Agra-Mumbai National Highway Viral Video: बॉलिवूडच्या चित्रपटातील सीनलाही लाजवेल, अशा चोरीचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चोरट्यांचे धाडस पाहून नेटकरीही हैराण झालेत.

Gangappa Pujari

थरारक स्टाईलमध्ये चोरीचे प्रकार हिंदी चित्रपटांमध्ये अनेकदा पाहायला मिळतात. धूम चित्रपटातील डेंजर चोरीचे सीनही प्रचंड गाजले. अगदी असाच विशेष म्हणजे चित्रपटाच्या सीनलाही लाजवेल, अशी चोरीची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. भररस्त्यात घडलेल्या या थरारक चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर चोरी, मारामाऱ्या, खतरनाक डान्स अन् भयंकर अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल असतात. यामधील अनेक हटके व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या एका अशाच चोरीच्या घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमधील चोरट्यांनी केलेले जीवघेणे धाडस पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकमधून चोरी करुन हे चोर दुचाकीवरुन फरार झाल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा थरारक व्हायरल व्हिडिओ मध्यप्रदेशातील शाजापुर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अगदी रोहित शेट्टीच्या चित्रपटालाही लाजवेल अशा स्टाईलमध्ये केलेल्या या चोरीच्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ही चोरीची घटना घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोटार सायकलवरुन आलेले तीन चोर आपला जीव धोक्यात घालून ट्रकवर चढतात. ट्रकवरील ताडपत्री कापून त्यामधील माल भरलेले बॉक्स रस्त्यावर फेकतात. त्यानंतर सगळा माल गोळा करुन पसार होतात. एका कारचालकाने मोबाईलमध्ये हा चोरीचा थरार कैद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

SCROLL FOR NEXT