Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या मेट्रोत महिलेचा 'फिटनेस स्टंट'! रेलिंगला लटकून केला वर्कआऊट; पाहा व्हिडिओ

Delhi Metro Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिलेने मेट्रोत असं काही केलं ते पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झालाय.

Tanvi Pol

Metro workout stunt: आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाला काहीतरी वेगळं, हटके करून व्हायरल व्हायचं असतं. त्यामुळे अनेकदा काहीजण धाडसी स्टंट करतानाही दिसतात. असाच एक अजब व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे, ज्यात एका महिलेने धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये स्टंटबाजी करत वर्कआऊट केलं आहे. मेट्रोच्या रेलिंगला लटकून तिनं जी कसरत दाखवली, ती पाहून ट्रेनमधील प्रवासीही अवाक झाले.

धावत्या ट्रेनमध्ये ‘जिम’?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्ली (Delhi Metro) मेट्रोमधून नागरिकांचा प्रवास सुरु असतो. त्यात एक तरुणी येते आणि चक्क मेट्रोतील रेलिंगला लटकून वर्कआऊट करण्यास सुरुवात करते. तरुणीने केलेला हा प्रकार पाहून तिथे बसलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

या व्हिडिओने इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. शिवाय काही जणांनी तिचं कौतुक केलंय, तर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''अजून काय पाहायच राहिला आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आम्ही तेव्हा तिथेच होतो' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.

सोशल मीडियावर यापूर्वी दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल झालेले आहेत. कधी महिलांची हाणामारी तर कधी कपल्सचे अश्लील कृत्य. पण तरुणीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील jagjot_k143 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत लाखोचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT