Bike Stunt: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ केवळ १३ सेकंदांचा असला तरी त्यामध्ये घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. या व्हिडिओत एक तरुण आपल्या मैत्रिणीसह दुचाकीवरून भरधाव वेगात जाताना दिसतो. पण वर्दळीच्या रस्त्यावर जात असताना वाहनाचा वेग जास्त आणि स्टंट करण्याच्या नादात भयंकर अपघात होतो.
व्हायरल (Viral)होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावरुन बरेच वाहनांची ये-जा होत असताना दिसत आहे. तेवढ्यात त्या रस्त्यावरुन एक स्पोर्ट्स बाईकवरुन एक कपल जात असतात. मात्र, त्यांच्या बाईकचा वेग अतिशय वेगवान असून बाईक स्टंट करत चाललेले असतात. पण काही अंतरावर जाऊन त्यांच्या बाईक दुसऱ्या दुचाकीला धडकली जाते आणि त्या बाईकवरुन ते दोघ जमिनीवर जोरदार आपटले जातात. सर्व धक्कादायक घटना एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झालेली आहे.
व्हायरल झालेली घटना नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्रा, फेसबूक आणि ट्वीटर या सर्व माध्यमांवर तुफान व्हायरल होत असून सध्या इन्स्टाच्या samacharplusofficial या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला (Video)लाखो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत
लाखोंचे लाईक्स मिळालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''असं केलं तर असंच पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''वाहन म्हणजे यांना खेळणं वाटतं'' तर काही यूजर्संनी ''यांच्यावर कारवाई करा'' अशा अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.