Fighting Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fighting Viral Video: वर्गात शिक्षण नव्हे, फ्री स्टाईल कुस्ती! दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओला पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. ज्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे काय घडते ते पाहून तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल. व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Student fight Video: अभ्यास करायाल चाललो असं घरातल्यांना सांगून घरातून बाहेर पडलेल्या दोन तरुणांनी अभ्यासाऐवजी क्लासेसमध्येच जोरदार हाणामारी केली आहे. सर्व विद्यार्थी अभ्यासात मग्न असताना मध्येच तरुणांच्या हाणामारीने क्लासचा शांत वातावरण गोंधळात बदललं. शिक्षकांनी हस्तक्षेप करत वाद थांबवला. आता विद्यार्थी ‘अभ्यासासाठी’ की ‘फायटिंगसाठी’ येतात, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

क्लासमध्ये दोन तरुण भिडले

व्हायरल (Viral) होत असलेली ही घटना कुठली आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, क्लासेस सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थी क्लास रुमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. काही विद्यार्थी अभ्यास करत होते तर काहींची मस्ती सुरु होती, असे चित्र व्हिडिओत दिसून येत आहे.

शांत दिसणारं हे वातावरण काही क्षणात बदललं. याच क्लासमधील दोन विद्यार्थ्यांमध्ये काही कारणांवरुन वाद सुरु होतो. पण, पाहत पाहता दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरु होते. अचानक वर्गात सुरु झालेला हा वाद पाहून काही विद्यार्थीं गोंधळात पडतात तर काहीजण यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत तुम्हाला दिसून येत आहेत.

हाणामारीचा (Fighting) हा व्हिडिओ @gharkekalesh या एक्स(ट्विटर) अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत शिवाय लोकांनी त्यावर मजेशीर तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: विद्यार्थ्यांच्या हाणामाराची हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादीत ३७ मतांचा मोठा पेच | VIDEO

Lagnanantar Hoilch Prem: नंदिनी परत येणार देशमुखांच्या घरात...; लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिकेच्या महापौर पदी विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड

T20 world cup 2026: पॅट कमिंसनंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक मोठा धक्का; वर्ल्डकपपूर्वीच हा खेळाडू बाहेर

WhatsApp वापरताय? या 5 सिक्रेट ट्रिक्स आत्ताच घ्या जाणून, मैत्रिणींसोबत चॅटिंगची डबल मज्जा येईल

SCROLL FOR NEXT