Jagannath Temple Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Jagannath Temple Video: जगन्नाथ मंदिराचा ध्वज गरुड घेऊन उडाला; व्हिडिओ आला चर्चेत

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध मंदिरातील व्हिडिओ प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण विविध प्रश्न निर्माणही करत आहेत. असे काय आहे व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Odisha Viral News: पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात 13 एप्रिल 2025 रोजी एक अद्भुत घटना घडली. एका गरुडाने मंदिराच्या नीलचक्रावर फडकणारा 'पतितपावन बाना' ध्वज आपल्या पंजात पकडून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली आणि नंतर समुद्राच्या दिशेने उडून गेला.

जगन्नाथ मंदिराचा व्हिडिओ चर्चेत

व्हायरल (Viral) होत असलेली ही घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली, त्याच वेळी किनारपट्टी भागात वादळी वारे आणि वीजांचा गडगडाट सुरू होता. गरुडाच्या प्रकटतेनंतर वादळ शांत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले .​

व्हिडिओने लोकांमध्ये उत्सुकता वाढली

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक भक्तांनी याला दैवी संकेत मानले आहे. काहींनी या गरुडाला भगवान विष्णूचा वाहन 'गरुड' म्हणून ओळखले. मात्र, मंदिर प्रशासनाने अद्याप या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही 

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video) सध्या इन्स्टाग्राम, फेसबूक आणि युट्युब या सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांत या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत.

टीप: हा मंदिरामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT