Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाऊस आला, तरी थांबला नाही उत्साह! नवरीने हळदीत केला धमाकेदार डान्स; व्हिडिओचा इंटरनेटवर धुमाकूळ

Bride Dancing in Rain: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात लग्न पार पडत आहे. पण सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे तुफान पाऊस पडत असताना देखील नवरीमुलगी डान्स करताना दिसत आहे.

Tanvi Pol

Bridal Haldi Dance: लग्न समारंभ म्हटलं की आनंद, उत्साह आणि ढोल-ताशांचा जल्लोष ओघाने येतोच. नुकतच सोशल मीडियावर अशाच एका नवरीच्या धमाल हळदी समारंभाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात जोरदार पावसाच्या सरींचा काहीही विचार न करता नवरीने आपल्या हळदीच्या कार्यक्रमात असा भन्नाट डान्स केला आहे.

पावसातही थांबला नाही उत्साह

व्हायरल(Viral) व्हिडिओत दिसते संपूर्ण वातावरण पावसामुळे भिजून गेलं आहे. मंडपात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत, असं असतानाही नवरीच्या डोळ्यात अश्रु न येता तिचा चेहरा उत्साहाने फुललेला आहे. हातात बांगड्या, डोक्यावर फुलांची वेणी आणि अंगभर हळदीचा रंग घेऊन ती आनंदाने नाचत होती.

सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

नवरीचा डान्स पाहून घरातील अनेकजण तिच्या सोबत डान्स करण्यासाठी मांडवात आले. नव्या नवरीचा डान्स पाहून अनेकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव केला. तिचा उत्साह, आत्मविश्वास आणि नृत्याची लय पाहून अनेकजण मंत्रमुग्ध झाले. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील laxmijadhav325 या अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून कॅप्शनमध्ये,''जोरात पाऊस, तरी नाचायचं नाय सोडायचं'' असं लिहिण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर नाही तर हा व्हिडिओ(Video) फेसबूक, एक्स(ट्वीटर) अशा प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याचजणांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''असा आनंद असाल तर कधीच कोणती काळजी वाटणार नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कमाल आहे नवरीची'' अशा प्रकारे नवरीच्या उत्साहाचे कौतुक प्रत्येक नेटकऱ्याने केले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT