Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रायरेश्वर पठारावर जिद्दीची शर्थ! दोन टनाचा ट्रॅक्टर चढवला डोंगरावर; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Pune District News: सोशल मीडियावर सध्या पुणे जिल्ह्यातील एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नवा इतिहास रचला गेला आहे. नक्की काय घडले आहे ते एकदा पाहाच.

Tanvi Pol

सागर आव्हाड, साम टीव्ही

Pune Viral Video: पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर शेतकऱ्याच्या जिद्दीने नवा इतिहास घडवला आहे. सुमारे चार हजार सहाशे फूट उंचीवर, डोंगरकड्यांतून दोन टन वजनाचा ट्रॅक्टर उचलून नेण्याची अवघड मोहीम यशस्वी करण्यात आली आहे.

संतोष जंगम या स्थानिक शेतकऱ्याने नव्याने ७०० HP क्षमतेचा ट्रॅक्टर (Tractor) खरेदी केला. मात्र, रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे, हा ट्रॅक्टर रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी संपूर्णपणे वेगळा करण्यात आला. नंतर तो वेगवेगळ्या भागांमध्ये उंच कड्यातील लोखंडी शिर्डी वरून चढवत नेण्यात आला.

या मोहीमेत २० ते २५ ग्रामस्थांनी सहभाग घेतला, आणि एकत्रितपणे ट्रॅक्टरचे प्रत्येक भाग डोक्या खांद्यावर घेऊन वर चढवण्यात आला. फक्त ट्रॅक्टरच नव्हे तर ट्रॉलीसुद्धा या जिद्दी माणसांनी वर नेली आणि पठारावर पुन्हा जोडली.

ही घटना (incident) म्हणजे शेतीसाठीची तळमळ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दर्शवणारा आदर्श ठरतोय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आधुनिक शेतीसाठीचा मार्ग मोकळा करत या शेतकऱ्याने नव्या पिढीला प्रेरणा दिली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT