Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चोरीसाठी आले आणि मार खाऊन गेले! महिलेनं पकडलं, जमावाने ठोकलं, VIDEO व्हायरल

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात सोनसाखळी चोरीचा प्रकार घडलेला आहे.व्हिडिओ नेकमा काय व्हायरल होत आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पहाच.

Tanvi Pol

Digha Viral News: गेल्या काही वर्षापासून सोनसाखळी चोरीच्या वारंवार घटना घडत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अनेक घटनांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात.सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.ज्यात एका महिलेची सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याच्याच अंगाशी आलेला आहे.

दिघा येथील विष्णुनगर परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी(Gold chain) चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याच्याच अंगाशी आलाय. दुचाकी वर आलेल्या दोघा चोरट्यापैकी मागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यात सोनसाखळी चोरीसाठी हात घातला असता सदर महिलेने प्रसंगावधान साधत त्याच दरम्यान दुचाकी चालविणाऱ्या त्याच्या साथीदाराचा हात पकडला.

दुचाकीला रस्त्यावर पाडले. यामध्ये गळ्यात हात टाकणारा चोरटा तर पळाला मात्र त्याचा साथीदार सापडला. महिलेने आरडाओरड करताच स्थानिक नागरिकांनी येत चोरट्याला चांगलाच चोप देत अद्दल घडवली.

चोरट्याला मोठ्या हिमतीने पकडण्याचे धाडस करणाऱ्या महिलेचे नाव भाग्यश्री गोस्वामी असून तिच्या धाडसाच सर्वत्र कौतुक होतंय. यावेळी नागरिकांनी चोरट्याला चोप देत असतानाचा व्हिडिओ(Video) वायरल होत असून नागरिकांनी चोरट्याला उचित कारवाईसाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केलेय

टीप : सध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT