Bullet Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Bullet Viral Video: शाब्बास पठ्ठ्या! अवघ्या ४ वर्षांचा चिमुकला बुलेट चालवतोय; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

Little Boy Rides Royal Enfield: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

Gangappa Pujari

4 Year Old Boy Ride Royal Enfield Bullet Video:

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात... अशी एक मराठी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच हल्लीची लहान मुले असे काही प्रताप करतात जे मोठ्यांनाही शक्य नसते. सोशल मीडियावर अशा लहान मुलांच्या कलांचे, त्यांच्या बाललिलांचे आणि थक्क करणाऱ्या कृतीचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

बुलेटवर बसून सफर करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव.. बुलेटवर स्वार व्हायला गडीही तसा दमदार अन् वजनदार पाहिजे असं म्हणले जाते. रॉयल एनफील्डची बुलेट म्हणजे वजनदार गाडी. त्याला चालवायला, सांभाळायला अन् फिरवायला गडीही तसा ताकदवार पाहिजे.. परंतु सोशल मीडियावरील एका व्हिडिओने हे सगळे समज दूर केलेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क एक चार वर्षांचा चिमुकला रॉयल एनफील्डची ३५० सीसीची बुलेट (Royal Enfield Classic 350) पळवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला रॉयल एनफील्डच्या ३५० सीसीच्या बुलेटवर बसला आहे. त्याचे वडिल त्याला गाडी सुरू करुन देत असून चालू करुन पुढे घेवून देतात. यानंतर तो चिमुकला ती बुलेट आरामात चालवताना, गाडी स्वतः बॅलन्स करत पळवताना दिसत आहे.

मुलाच्या सुरक्षेसाठी त्याच्या वडिलांनी त्याला हेल्मेटही घातले असून अगदी हसत हसत चिमुकला ही वजनदार गाडी पळवत आहे. मुलाचे धाडस पाहून त्याचे वडिलही चकित झाल्याचे पाहायला मिळत असून हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या मुलाचे धाडस आणि कौशल्याचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी लहान मुलांसोबत असा धोका पत्करणे योग्य नाही, असेही म्हणले आहे. एका नेटकऱ्याने हा मुलगा पुढे चांगला बाईक राईडर होईल.. असे भाकितही सांगितले आहे. थोडक्यात या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT