Trekking Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Trekking Viral Video: जिद्द अन् धाडसाला सलाम! दोन्ही पाय नाहीत पण डोंगर चढला; प्रेरणादायी व्हिडिओ पाहाच...

Inspirational Viral Video: धडधाकड व्यक्तीही घाबरेल.. असे धाडस करणाऱ्या या तरुणाचा हा व्हिडिओ एका आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे.

Gangappa Pujari

Disabled Person Climbing On Mountain Viral Video: पावसाळा सुरू झाला की तरुणाईला ट्रेकिंगचे वेध लागतात. ट्रेकिंंग हा अनेकांसाठी आवडीचा विषय असला तरी हे वाटत तितकं सोप्प काम नाही. भले- भले डोंगर चढायला, उतरायला प्रचंड धाडस लागतं. म्हणून अनेकांना ह्या ड्रेकिंगची भितीही वाटते.

पण मनात जिद्द अन् धाडस असले की अशक्य काहीच नाही.. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे या व्हिडिओची व्हायरल कथा? चला जाणून घेवू... (Viral Video News In Marathi)

काय आहे व्हिडिओ...

ट्रेकिंग करायचं म्हणलं की अनेकांचे पाय थरथरायला लागतात. ज्याला दोन पाय आहेत असा धडधाकट व्यक्तीही कधीकधी ट्रेकिंगला घाबरतो. पण मनात जिद्द अन् करायचं अस ठाम ठरवलं की माणूस काहीही करु शकतो. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ..

पाय नसताना करतोय ट्रेकिंग...

या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क दोन्ही पाय नसलेला तरुण जिद्दीने डोंगर चढताना दिसत आहे. त्याच्या दोन्ही पायाच्या ठिकाणी कृत्रिम आर्टिफिशियल फिक्सचर बसवण्यात आले आहेत. असे कृत्रिम पाय घेवून हा तरुण डोंगर चढताना दिसत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जिद्द अन् धाडसाच उदाहरण....

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) आर्टिफिशियल फिक्सचर बसवलेल्या अवस्थेत हा तरुण ज्या पद्धतीने डोंगर चढत आहे. ते पाहून नेटकरी चक्रावून गेले आहेत. आपल्या अडचणींचा पाढा न वाचता त्याच्यावर जिद्दीने मात करणाऱ्या या तरुणाच्या धाडसाला नेटकऱ्यांनी सलाम केला आहे. त्याच्या या इच्छाशक्तीवर नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

IPS अधिकाऱ्यांनी शेअर केला व्हिडिओ...

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून कोणीही रोखू शकत नाही.." असा प्रेरणादायी कॅप्शन दिला आहे. आणि हा व्हिडिओ पाहून खरंच याची प्रचिती येईल की आपल्या आयुष्यात आपण आपल्या स्वप्नांसाठी कसे प्रयत्न करतो; हे फार महत्वाचं असून अडचणी सांगण्यापेक्षा जिद्दीने मात करण्यातच खरा शूरपणा आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देत त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला ७९ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. काही जणांनी हा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले आहे..

काहींनी आपण सामान्य लोकही अस धाडस करण्याचा विचार करु शकत नाही.. असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे. थोडक्यात अनेकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT