Train Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Train Viral Video: नशेत धुंद तरुण थेट रेल्वे रुळांवर झोपला; समोरुन ट्रेन आली अन्...काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Young Man slept on The Railway Tracks: एका मद्यपी तरुणाने नशेत थेट रेल्वे स्थानक गाठले. त्यानंतर तो रेल्वे रुळांवर जाऊन बसला.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Viral Video: एक मद्यपी व्यक्ती कधी काय करेल याचा काही नेम नाही. नशेत धुंद होत या व्यक्ती काय वागतात, काय बोलतात याची त्यांना काहीच माहिती नसते. अशात कल्याण रेल्वे स्थानकात एक भयंकर घटना होताहोता राहीली आहे. एका मद्यपी तरुणाने नशेत थेट रेल्वे स्थानक गाठले. त्यानंतर तो रेल्वे रुळांवर जाऊन बसला. तरुणाला रेल्वे रुळांवर पाहून उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. (Latest Viral Video News)

मद्यपीने थेट रेल्वे रुळावर ठाण मांडले होते. यावेळी समोरुन त्या रुळांवर एक लोकल ट्रेन आली. आता हा तरुण रुळांखाली चिरडला जाणार असं सर्वांना वाटत होतं. तितक्यात सुदैवाने लोकल ट्रेनच्या मोटरमनचे लक्ष गेले. प्रसंगावधान राखत मोटरमनने ट्रेन थांबवली आणि मोठा अनर्थ घडताघडता टळला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आत्महत्या करण्यासाठी हा तरुण रेल्वे रुळावर ठाण मांडून बसला होता. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला.

सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर एक हून सी एस टी एमच्या दिशेने लोकल निघाली. रेल्वे स्थानकापासून (Railway Station) काही अंतरावर रेल्वे रुळावर एक तरुण ठाण मांडून बसल्याचे लोकलच्या मोटरमनच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवत आरपीएफला पाचारण केले. आरपीएफने या तरुणाला ताब्यात घेतले. मद्यप्राशन केलेला हा तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर बसला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT