Ride Accident Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

Somnath Mandir Yatra Ride Accident Viral Video: नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा येथे सोमवारी सोमनाथ महादेव मंदिर यात्रेत मोठा अपघात झाला. ५० फूट उंच टॉवर राईड कोसळून पाच जण जखमी झाले असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा येथील सोमनाथ महादेव मंदिर परिसरात रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आयोजित केलेल्या जत्रेत ५० फूट उंच टॉवर राईड अचानक खाली पडली, ज्यामुळे राईडवर बसणाऱ्या १० पैकी ५ जण जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात वेरावळजवळ सोमनाथ महादेवाचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. श्रावण महिन्यात सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. काल शेवटचा सोमवार होता यामुळे भाविकांची येथे मोठी गर्दी होती. दर्शन घेतल्यानंतर भाविक यात्रेत आनंद घेत होते. यात्रेत स्टॉल्स, मोठ मोठे पाळणे देखील होते. दरम्यान ५० फूट उंच टॉवर राईड अचानक खाली पडली ज्यामध्ये १० जण होते त्यापैकी ५ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, या अपघातात दोन मुलांसह पाच जण जखमी झाले. तर राईड ऑपरेटरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सुरतमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात राईड कोसळल्यानंतर गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT