UP Heart Attack Viral Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

UP Heart Attack Viral Video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका युवा खेळाडूचा जीममध्ये वर्क आऊट करतानाच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

अलिकडे हृदयविकाराचे धक्के येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हार्ट अटॅकचा धोका जाणवत असून अगदी चालता बोलता, जेवत्या ताटावर मृत्यू ओढावल्याच्या घटना घडत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका युवा खेळाडूचा जीममध्ये वर्क आऊट करतानाच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

हे संपूर्ण प्रकरण उत्तरप्रदेशच्या वाराणसीमधील आहे. वाराणसी शहरातील सिद्धगिरी भागात एक 32 वर्षीय युवक जिममध्ये व्यायाम करत होता. जीममध्ये वर्क आऊट करत असतनाच त्याचे डोके दुखू लागले अन् तो जमिनीवर कोसळला. तरुणाला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

वाराणसीच्या चेतगंज भागातील पियारी भागात राहणारा 32 वर्षीय दिपक गुप्ता हा बॉडी बिल्डिंगचे काम करायचा. नेहमीप्रमाणे तो शहरातील सिद्धगिरी बाग परिसरात असलेल्या जिममध्ये व्यायामासाठी आला होता. व्यायाम करताना डोके दुखू लागल्यावर तो खाली बसला आणि डोके धरले. त्यानंतर काही वेळात तो वेदनेने तडफडू लागला. दिपकला तात्काळ महमूरगंज परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, व्यायामानंतर दीपकला ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हृदयाच्या आकारात वाढ झाल्यामुळे असे होऊ शकते. दिपक यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी भावूक प्रतिक्रिया दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

SCROLL FOR NEXT