मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

Behind The Scenes: मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसलेली असतानाच काँग्रेसनं महापालिकेसाठी नवा प्लॅन आखलाय... ठाकरेसेनेसोबत काँग्रेस मैत्रीपूर्ण पॅटर्न नेमका कसा राबवणार? काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नेमका कोणता प्रस्ताव मांडला जाणार आहे?
Congress and Thackeray Sena explore a friendly electoral strategy to counter BJP in the upcoming BMC elections.
Congress and Thackeray Sena explore a friendly electoral strategy to counter BJP in the upcoming BMC elections.saam tv
Published On

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत जो प्रयोग यशस्वी झाला, तोच प्रयोग महापालिका निवडणुकीत राबवण्याचा विचार काँग्रेसकडून सुरु आहे... ज्या वॉर्डात काँग्रेस कमकुवत आहे तिथे ठाकरेसेनेला पाठिंबा घ्यायचा, असा हा 'मैत्रीपूर्ण' पॅटर्न काँग्रेस राबवण्याच्या तयारी आहे... यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

काय आहे काँग्रेसचा प्रस्ताव?

मुंबईत भाजपविरोधी मतांची विभागणी टाळणं महत्त्वाचं

दलित-मुस्लिम मतांमध्ये मराठी मतांची भर पडल्यास निकाल फिरणार

कमकुवत वॉर्डात ठाकरेसेनेला पाठिंबा देऊन परस्परांना सहकार्य

महाराष्ट्रात काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा प्रस्ताव चर्चिला जाणार असून राहुल गांधींनीही ठाकरेसेनेसोबत मैत्री टिकवण्याची भूमिका मांडल्याची चर्चा आहे...अमीन पटेल, नसीम खान आणि अस्लम शेख यांसारख्या मुंबईतील दिग्गज नेत्यांचाही या प्रस्तावाकडे सकारात्मक कल आहे.

'या' वॉर्डात काँग्रेसचा ठाकरेंना पाठिंबा

वरळी, दादर, माहिम या वॉर्डात ठाकरेसेनेचे प्राबल्य असून काँग्रेसचा प्रभाव कमी

शिवडी, परळ, लालबागमध्ये काँग्रेसचा प्रभाव कमी असल्यानं ठाकरेसेनेला काँग्रेसची मदत

विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग या मराठीबहुल वॉर्डात ठाकरेंना काँग्रेसचा मदतीचा हात

दहिसर, मागाठाण्यात मराठी मतदारांची संख्या जास्त असल्यानं काँग्रेसचा पाठिंबा

याआधी राऊतांनीही काँग्रेसला मुंबई महापालिकेत सोबत घेण्याबाबत भाष्य केलं होतं...

दुसरीकडे मराठीबहुल मतदारसंघात ठाकरेसेनेला पाठिंबा देत असताना काँग्रेस धारावी, कुर्ला, मालाड पश्चिम आणि मुंबादेवी यांसारख्या अल्पसंख्याक आणि उत्तर भारतीय बहुल भागांत ठाकरेसेनेकडून मदत घेतली जाणार आहे... त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेसेनेत या प्रस्तावावर एकमत झाल्यास दोन्ही पक्षांना याचा फायदा होईल... दरम्यान या प्रस्तावावर लवकरच संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला जाणार असल्याचीही चर्चा आहे... काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नेमकं काय होतं... आता राऊतांनी घातलेल्या भावनिक सादेला प्रतिसाद देऊन काँग्रेस हा मैत्रीपूर्ण पॅटर्न महापालिका निवडणुकीत राबवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com