शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

Ajit Pawar Reaction After Municipal Election: नगरपालिका निवडणुकीत भाजप पाठोपाठ शिंदेसेनेला चांगलचं यश मिळालं... अशातच नगरपालिकेच्या निकालानंतर अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना चांगलीच तंबी दिलीय... दादा नेमकं काय म्हणाले?
Deputy Chief Ministers Ajit Pawar and Eknath Shinde during the municipal election campaign in Maharashtra.
Deputy Chief Ministers Ajit Pawar and Eknath Shinde during the municipal election campaign in Maharashtra.Saam Tv
Published On

पालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयानंतर आता महायुतीतच ईर्षेची लढाई रंगलीये. शिंदेंना मिळालेल्या घवघवीत यशानं अजित दादा आपल्याच मंत्र्यांवर नाराज झालेत. या निकालांमध्ये जनतेनं भाजपला पहिली पसंती शिंदेंना दुसरी तर राष्ट्रवादीला तिसरी पसंती दिलीय.यामुळे संतापलेल्या अजित दादांनी आपल्या मंत्र्यांच्या पक्षप्रचाराच्या आणि निवडणुकीतील सुमार कामगिरीवर आक्षेप घेत काही मंत्र्यांना खडेबोल सुनावल्याचं कळतंय.

मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, नरहरी झिरवळ आणि बाबा अत्रामांबाबत नाराजी

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी नीट पार पाडली नाही

मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे शिंदेसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्याचं निरीक्षण

गडचिरोलीत पक्ष पूर्ण ताकदीने पाठीशी असूनही अपेक्षित यश न मिळाल्याने नाराजी

जबाबदारी झटकणाऱ्या मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन-दोन उपमुख्यमंत्री असून त्यांनी या निवडणूकांमध्ये झोकून देत प्रचार केला होता. अजित पवारांनी देखील सभांचा धडाका लावत निवडणूक लक्षवेधी केली ग्रामीण भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व असूनही शिवसेनेला पहिल्यांदाच इतकं मोठं यश मिळल्यानं अजित दादा अस्वस्थ झाले.

पक्ष नगराध्यक्ष नगरसेवक संख्या

भारतीय जनता पक्ष ११७ २,४३१

शिवसेना (एकनाथ शिंदे)५३ १,०२५

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)३७ ९६६

शिंदे आणि अजित दादांना मिळालेल्या पसंतीच्या आकड्यांमध्ये फार मोठा फरक नाही. तरी देखील अजित पवारांनी मंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे अजित पवार येत्या निवडणुकांमध्ये विरोधकांसोबतच मित्रपक्षांच्या विरोधातही मोठी रणनिती आखत सगळ्याच मंत्र्यांसोबतच आमदारांना आणि खासदारांनाही कामाला लावणार एवढं निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com