viral video  Saam tv
व्हायरल न्यूज

Maratha Reservation : मुंबईत भगवं वादळ सुसाट! मराठा आंदोलनात थार गाडी नाचायला लागली, VIDEO व्हायरल

Maratha Reservation news : मुंबईत भगवं वादळ सुसाट सुटलं आहे. याच आंदोलनात मराठा आंदोलक चालकाने थार गाडी नाचवली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईकडे कूच केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडलं आहे. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईला पोहोचले आहेत. या मराठा आंदोलकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठा आंदोलनात थार गाडी एका आंदोलकांने नाचवली. या मराठा आंदोलकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलं आहे. मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्टेशनवर गर्दी पाहायला मिळत आहे. सीएसएमटी स्टेशनवरही आंदोलकांकडून जल्लोषात आंदोलन सुरु आहे. तर काही आंदोलक मंत्रालयाच्या समोर आंदोलनाला बसल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील आझान मैदान परिसरात सर्व ठिकाणी आलेल्या आंदोलकांमुळे परिसर भगवामय झाला आहे. मराठा आंदोलकांकडून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधून घेत आहे.

राज्यातील कानाकोपऱ्यातून काही मराठा आंदोलक खासगी वाहनांतून मुंबईत पोहोचले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी काही आंदोलक थार गाडीने आले. याच आंदोलकांनी रस्त्यावर अचानक थार गाडी थांबवली. त्यानंतर चालकाने रस्त्यावर थार गाडी नाचवली. थार गाडी नाचवल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला. थार गाडी नाचवण्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

मी महाराष्ट्राचा मुसलमान... आंदोलकाने लक्ष वेधलं

मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. ओबीसीतून आरक्षण मिळावे, याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरावाटी सराटीतून मराठ्यांना आंदोलनासाठी मुंबईत येण्याचं आवाहन केलं होतं. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दर्शवत पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनादरम्यान एका मुस्लिम बांधवानेही मोर्चाला पाठिंबा दिला. त्यानंतर मराठा बांधवांनी या व्यक्तीला खांद्यावर घेऊन नाचवलं. मी महाराष्ट्राचा मुसलमान मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, असा फलक घेऊन तो आलाय. या व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT