Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकल्याच्या बड्डे पार्टीत तात्या विंचूची एन्ट्री; पाहुण्यांसह साऱ्यांचीच पळापळ, मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Tatya Vinchu In Viral Birthday Party: व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याच्या वाढदिवस पार्टीत तात्या विंचूच्या एन्ट्रीने साऱ्यांनाच धडकी भरवली आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. यामध्ये कधी लग्नातील भन्नाट डान्स तर कधी भुवया उंचवायला लावतील अशा अनेक व्हिडीओ असतात. असाच एक वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आजकाल बड्डे पार्टीला विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. या शिवाय लहान मुलांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम (Program)असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकल्याच्या वाढदिवस पार्टीत तात्या विंचूने एन्ट्री केली आहे. तात्या विंचूच्या एन्ट्रीने साऱ्यांनाच धडकी भरवली आहे.

ठाण्यामध्ये ढोकाळी येथे कु. हेरंब अतुल गंभीरराव या चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाला लायटिंग डेकोरेशन, कार्टून तसेच संगीतमय कार्यक्रम होते. लहान मुले तसेच मोठ्या मंडळीसाठी वेगवेगळे कार्यक्रम होते. यावेळी वाढदिवस सेलिब्रेशनच्यावेळी अचानक तात्या विंचूच्या एन्ट्रीने सर्वच थक्क झाले. काही लहान मुले घाबरली तर काहीनी हात मिळवत आनंद साजरा केला. यावेळी अनेकांना झपाटलेल्या चित्रपटातील तात्यां विंचूची आठवण जागी केली.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये 'वाजले की बारा' या गाण्यावर तात्या विंचू डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तुफान लाईक्स आले असून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT