Nap In Restaurant Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Nap In Restaurant Viral Video: खाऊन पिऊन घ्या झोपून; रेस्टॉरंटची भन्नाट ऑफर आहे तरी काय?

Ruchika Jadhav

Restaurant Allows Customers Nap: जिभेचे चोचले पुरवणे प्रत्येकालाच आवडतं. यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध आणि चमचमीत पदार्थ चाखण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जातात. अनेकदा सहकुटुंब रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा बेत आखला जातो. बाहेरचं स्वादिष्ट जेवण जेवल्यावर पोट अगदी टम्म फुगतं आणि फार झोप येते.

अशावेळी जेवण झाल्यावर रेस्टॉरंटमध्येच आराम करण्याची सोय झाली तर. ऐकायला नवल वाटत असलं तरी हे खरं आहे. एका हॉटेलमध्ये चमचमीत जेवण झाल्यावर थेट झोपण्याची सोय देखील करण्यात आलीये. जेवण जास्त झाल्यावर डोळ्यांवर चांगलीच गुंगी येते. अशावेळी रेस्टॉरंटमध्येच झोपण्याची सोय असल्याने अनेकांसाठी ते फायद्याचं ठरतं.

जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये असलेल्या मोआब या रेस्टॉरंटमध्ये ही भन्नाट ऑफर सुरू आहे. या हॉटेलमध्ये चमचमीत जेवण मिळतं. त्यांनंतर ज्यांना जेवण (Food) करुन बाहेर जाण्याआधी एखादी झोप काढावी वाटते त्या व्यक्तींसाठी या हॉटेलात सोय केलीये. मऊमऊ गादी असलेल्या बेडसह एसीत झोपण्याची परवानगी इथे दिली जाते.

हॉटेल (Hotel) मालकांनी एका अरब माध्यम संस्थेला मुलाखत दिली आहे. आपल्या मुलाखतीत त्यांनी हॉटेल चालवण्याचा अनुभव सांगितलाय. यात त्यांनी म्हटलं की, काही वर्षांपूर्वी एका ग्राहकाने जेवणानंतर झोपण्यासाठी बेडची सोय असावी असं मस्करीत म्हटलं होतं. त्यानंतर आम्ही यासाठी एक स्वतंत्र खोली घेतली आहे.

जेवणानंतर अनेक व्यक्ती येथे झोपतात, आराम करतात. @nowthisnews नावाच्या ट्वीटर अकाउंटवर हॉटेलचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT