Teacher Student Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Teacher Student Viral Video: गुरु असावा तर असा...विद्यार्थांच्या आनंदासाठी शिक्षकाची प्रमेळ वागणूक, पाहा VIDEO

Viral Video: सर्वांच्या मनात शिक्षकांचे आदराचे स्थान असते. शिक्षकांनी आपल्याला एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित करण्यात मदत केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Teacher Student Viral Video

सर्वांच्या मनात शिक्षकांचे आदराचे स्थान असते. शिक्षकांनी आपल्याला एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित करण्यात मदत केली आहे. तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात शिक्षक नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात आणि कठीण परिस्थितीचा सामना करायला शिकवतात. मात्र सध्याची परिस्थिती ही काहीशी बदलली आहे. सोशल मीडियावर कायमच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण अशातच सोशल मीडियावर काही विद्यार्थांनी एका शिक्षकास सप्राईज देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका रुममध्ये काही मुल आपल्या शिक्षकाची वाट बघत उभे आहेत. व्हिडिओतून आपल्याला समजते की त्यांनी आपल्या शिक्षकासाठी काही तरी सप्राईज प्लान केले आहे. जेव्हा शिक्षक त्या रुममध्ये येतात तेव्हा एका मुलाच्या हातात असलेल्या पेपरबाल्टने शिक्षकाचे स्वागत करण्याचा मुलांचा प्रयत्न फसतो. पण या शिक्षकांनी मुलांचा हिरमोड न होऊ देता परत त्या रुममध्ये प्रवेश करतात तरीही मुलांचा प्रयत्न पुन्हा फसतो. शेवटी जाऊन मुलांचा प्रयत्न यशस्वी होतो. या व्हिडिओत दिसते की, मुलांचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर शिक्षकाच्या भोवती जमतात. शेवटी मुलांच्या आणि शिक्षकाच्या चेहऱ्यावरील आनंद हा खूप काही सांगून जातो.

@RVCJ_FB या ट्वीटर अंकाऊटंवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ तेथील रुममध्ये असलेल्या एका विद्यार्थ्यांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही. आजच्या काळात विद्यार्थां आणि शिक्षकाचे असे सुदंर नाते कायम टिकून राहावे असे आपल्याला वाटेल.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षांव केला आहे. एका यूजर्सने लिहिल आहे की, 'एक आमचे शिक्षक असायचे की असे केले असते तर वर्गातून कोंबडा करुन हाकलून दिले असते' तर आणखी एकाने म्हटल की ' नक्की हा या विद्यार्थ्यांचा गणिताचा शिक्षक नसेल'. काही नेटकऱ्यांनी शिक्षकाचे भरभरुन कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT