kolhapur: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणं येरागबाळ्याचं काम नाही. पण हे शक्य केलंय एका मेंढपाळाच्या पोरानं. दरवर्षी हजारोंच्या संख्येनं उमेदवार आपले नशीब आजमावून बघतात. पण त्यातील काहींनाच यश मिळतं. या विद्यार्थ्यांच्या संघर्षामागं बऱ्याच प्रेरक कथा असतात. बीरदेवची कहाणीही तशीच आहे. सनदी अधिकारी व्हायचं असं स्वप्न बघणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो मुलांना बीरदेवचा हा संघर्षमय प्रवास प्रेरणा देणारा आहे.
बिरदेव (Birdev Done IPS)) याचं आयुष्यात काहीतरी मोठं होण्याचं स्वप्न होतं. त्यातही त्याला यूपीएससी परीक्षा पास करण्याची इच्छा होती. त्यासाठी, बिरदेवने एप्रिल २०२१ पासून यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने खूप मेहनत केली. बिरदेवने पहिल्यांदा २०२२ साली पहिली परीक्षा दिली होती. मात्र, त्यात त्याला अपयश आले. पण २०२५ साली त्याला यश आले.
परिक्षेची तयारी करत असताना बीरदेवने अन्यही काही परिक्षा दिल्या होत्या. ज्यामध्ये त्याला नेव्ही आणि पोस्टामध्ये काम करण्यासाठी संधी मिळाली होती. पण २०१७ साली यूपीएससीची तयारी करण्याची त्याची इच्छा असल्याने त्याने या नोकऱ्या रिजेक्य केल्या. बीरदेव यांचा निर्णय कठीण होता. पण शेवटी त्याच्या मेहनीचे फळ त्याला मिळाले.
कोल्हापुरच्या (kolhapur) बीरदेव यांची कथा केवळ प्रत्येसाठी एक संघर्षाची कथा नाही, तर ती एक जीवनाची शिकवण ठरतं आहे. यावरून प्रत्येकाला शिकायला मिळालं की, धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे मुख्य घटक आहेत. आपल्या मनातील उद्दिष्टावर टिकून राहणे, अपयशाला धैर्याने सामोरे जाणे, आणि आपली क्षमतांना आणि ताकदीला ओळखून नवा मार्ग स्वीकारणे हे प्रत्येक व्यक्तीला शिकायला हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.