Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: नगरची 'सुपर डान्सर'; विद्यार्थिनीच्या लईच भारी डान्सला प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद, पाहा VIDEO

Dance Viral Video: व्हिडिओमध्ये तिने गौतमीला ही टक्कर देत एकदम ठसकेबाज लावणीसह हिंदी गाण्यावर उत्तम असा डान्स सादर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Student Viral Video

सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन व्हिडिओ तसेच अनेक घटनांचे फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही सर्वांना आश्चर्यात पाडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीने सादर केलेल्या डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने गौतमीला ही टक्कर देत एकदम ठसकेबाज लावणीसह हिंदी गाण्यावर उत्तम असा डान्स सादर केला आहे. सध्या या तरुणीच्या डान्सची सोशल मीडियावर तूफान चर्चा होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला नक्कीच तरुणीच्या डान्स सादरीकरणाचे कौतुक कराल तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ एका विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील आहे. या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून तरुणीने डान्स केला आहे. सुरुवातीला तरुणीने मराठी गाण्यावर उत्तम अशा स्टेप करत त्यानंतर हिंदी गाण्यावरही डान्स सादर केला आहे. तरुणीने सादर केलेल्या डान्समधील सर्व लावणी स्टेप्स आणि हावभाव तसेच उत्साह तुम्हीही पाहून थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, व्हिडिओ एका विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन आहे. या कार्यक्रमात तरुणी स्टेजवर डान्स सादर करताना दिसत असून स्टेजखाली इतर विद्यार्थी बसलेले आहेत. जसा डान्स सुरु होतो त्याक्षणी तरुणीच्या डान्स स्टेप्स पाहून खाली बसलेले विद्यार्थी तिला दाद देत आहेत तर काहीजण संपूर्ण डान्स मोबाईलमध्ये कैद करत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ नगरमधील असल्याचे समजते.

( Chala Hawa Yeu Dya) 'चला हवा येऊ द्या' नावाच्या एका फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये' मराठी लावणी' आणि 'अफगान जलेबी' या हिंदी गाण्यावर तरुणीने डान्स सादर केला आहे. फेसबुकवरील या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. या व्हायरल फेसबुक रीलवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे की,'खूपच छान' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'मस्तच डान्स केला पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT